मुंबई

UMC Election 2026 : उल्हासनगरमध्ये ‘लक्ष्मी दर्शनाचा’ प्रयत्न फसला! प्रचाराची सांगता होताच 50 लाखांची रोकड जप्त; भाजपवर संशयाची सुई

•समाजसेवक नरेश गायकवाड यांच्या सतर्कतेमुळे रिक्षातील घबाड उघड; विठ्ठलवाडी पोलिसांत रिक्षाचालक ताब्यात

उल्हासनगर | उल्हासनगर महानगरपालिका निवडणुकीच्या (UMC Election 2026) मतदानाला अवघे 24 तास उरले असताना शहरात पैशांच्या उधळणीचा संशय बळावला आहे. मंगळवारी (13 जानेवारी) सायंकाळी 5 वाजता जाहीर प्रचार संपल्यानंतर काही वेळातच सुभाष टेकडी परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात एका रिक्षातून 50 लाख रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, समाजसेवक आणि अपक्ष उमेदवार नरेश गायकवाड यांनी एका रिक्षाचा संशयास्पदरीत्या पाठलाग केला. ही रिक्षा कॅम्प नंबर 3 परिसरातून सुभाष टेकडीच्या दिशेने जात होती. आंबेडकर चौकात रिक्षा पोहोचताच गायकवाड यांनी स्थानिक नागरिक आणि प्रशासनाच्या मदतीने रिक्षा अडवली. संशयास्पद बॅग पाहताच निवडणूक भरारी पथकाला पाचारण करण्यात आले. तपासणी केली असता, बॅगेत 50 लाख रुपयांच्या नोटांचे बंडल आढळले. प्राथमिक माहितीनुसार, रक्कमेची बॅग पाहताच रिक्षामधील काही लोक पळून जाण्यात यशस्वी झाले, मात्र पोलिसांनी रिक्षाचालकाला ताब्यात घेतले आहे.

भाजपवर आरोपांच्या फैरी

या कारवाईनंतर अपक्ष उमेदवारांनी आणि विरोधकांनी ही रक्कम भाजपची असल्याचा थेट दावा केला आहे. “आम्ही या रक्कमेचा पाठलाग करत होतो आणि ही रक्कम मतदारांना वाटण्यासाठी नेली जात होती, याचे पुरावे आमच्याकडे आहेत,” असे नरेश गायकवाड यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
मात्र, भाजपने हे सर्व आरोप धुडकावून लावले आहेत. भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश वधारिया यांनी स्पष्ट केले की, “जप्त केलेल्या रक्कमेशी भाजपचा कोणताही संबंध नाही. निवडणुका जिंकण्यासाठी आम्ही अशा मार्गाचा अवलंब करत नाही.”

vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

7 hours ago