Ullhasnagar Crime News : 24 तासांत गुन्हा उघडकीस ; 4 वर्षांच्या अपहृत चिमुकलीची सुटका; आरोपी मध्यप्रदेशातून अटक

Ullhasnagar Crime News : गुन्हे शाखा उल्हासनगरच्या तातडीच्या कारवाईला यश,सीसीटीव्ही आणि गुप्त माहितीच्या आधारे आरोपीच्या मुसक्या आवळल्या
उल्हासनगर | अवघ्या 4 वर्षांची चिमुरडी… डोळ्यात हजार स्वप्नं… पण अपहरणकर्त्याने तिचं बालपण हिरावून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनीही हार मानली नाही. गुन्हा दाखल होताच उल्हासनगर गुन्हे शाखेच्या अधिकारी-अंमलदारांनी सुसूत्र आणि धाडसी कारवाई करत केवळ 24 तासांत मध्यप्रदेशातून आरोपीला अटक केली आणि चिमुकलीला सुखरूप परत आणलं. Ullhasnagar Latest News
ही घटना बदलापूर पश्चिम पोलीस ठाणे Badlapur Police Station हद्दीतील असून, स्नेहा (बदललेले नाव) (वय 4 वर्षे 6 महिने) हिचे आरोपी रंजीत बिसनलाल धुर्वे (वय 26) याने अपहरण केले होते. तो तिला घेऊन मध्यप्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातील मोरडोगरी गावात जात असल्याची माहिती गुप्त बातमीदारांमार्फत मिळाली.
सीसीटीव्ही फुटेज आणि खात्रीशीर गुप्त माहितीच्या आधारे उल्हासनगर गुन्हे शाखा, घटक-4 चे विशेष पथक तात्काळ मध्यप्रदेशात रवाना करण्यात आले. अंबरनाथ आणि बदलापूर पश्चिम पोलिसांचाही समावेश असलेल्या या संयुक्त पथकाने उमरेठ पोलीस ठाण्याच्या मदतीने 25 जून रोजी संध्याकाळी 5 वाजता आरोपीला अटक केली.
अमरसिंह जाधव, पोलीस उप आयुक्त, गुन्हे सचिन गोरे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-4, उल्हासनगर, शैलेश काळे, सहायक पोलीस आयुक्त, अंबरनाथ विभाग शेखर बागडे, सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे (शोध-1) यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीरंग गोसावी, पोलीस उपनिरीक्षक नागेश्वर मुंडे, अशोक पवार, पोलीस हवालदार गणेश गावडे, राजेंद्र थोरवे,चंद्रकांत पाटील, मंगेश जावध, चंद्रकांत सांवत, पोलीस शिपाई रामदास उगले असे पोलीस पथकाने केली आहे. तसेच पोलीस निरीक्षक, संदीप ओंबासे, आरपीएफ एसआयडी, सोलापुर विभाग, महिला पोलीस उपनिरीक्षक सोनाली नंदेश्वर, आरपीएफ अंबरनाथ विभाग व आरपीएफ विभाग कल्याण यांनी सहकार्य केले.


