Ullhasnagar Bag Robbery News : पैशांची बॅग चोरट्यांनी हिसकावून लांबविली. बॅगेमध्ये 3 लाख रुपयांची रक्कम होती. विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून बॅग पळविणाऱ्या दोघांच्या मुसक्या आवळल्या आहे
उल्हासनगर :- उल्हासनगर शहरातील भागात एका 59 वर्षीय व्यक्तीच्या हातात असलेली पैशांची बॅग चोरट्यांनी हिसकावून लांबविली. Ullhasnagar Bag Robbery News बॅगेमध्ये 3 लाख रुपयांची रक्कम होती.दोघांनी सोमवारी दुपारच्या सुमारास ही बॅग पळविली होती. याप्रकरणी शरद गुलाब सिंग (59 वय रा. मराठा सेक्शन उल्हासनगर) यांच्या फिर्यादीवरून अज्ञात दोघांविरुद्ध विठ्ठलवाडी पोलिस ठाण्यात आरोपींच्या विरोधात बी एन एस कलम 309(6),351(3),3(5) प्रमाणे जबरी चोरीचा गुन्हा नोंदविण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शरद सिंग यांना दोन अनोळखी व्यक्तीने पाठलाग करून त्यांच्या ताब्यातील तीन लाख रुपये असलेली बॅग गळा दाबून व मारहाण करून जबरीने चोरून नेली. त्यासंदर्भात सिंग यांनी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात चोरीच्या तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी गुन्हे शाखा युनिट-4 त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रवीण खोचरे आणि पथकातील अंमलदार यांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे खात्रीशीर बातमीदाराच्या माहितीनुसार आरोपी हे अंबरनाथ येथील म्हाडा कॉलनी येथे असल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांनी या परिसरात सापळा रचून दोघाजणांना ताब्यात घेतले त्यांची सखोल चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केल्याचे कबूल केले आहे. तसेच पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून 45 हजार 600 रुपये जप्त केले आहे. अक्षय भिमराव चलवादी (वय 23) अरबाज अब्दुल सलाम शेख उर्फ पापा (वय 26 रा. बुवापाडा अंबरनाथ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलीस पथक
अमरसिंह जाधव, पोलीस उप आयुक्त, गुन्हे, शेखर बागडे सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे, अशोक कोळी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा, युनिट-4, उल्हासनगर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक प्रवीण खोचरे, पोलीस हवालदार गावडे, वाघ, पोलीस शिपाई राजेंद्र थोरवे यांनी केलेली आहे.
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…