Ulhasnagar Tadipar News : उल्हासनगर मध्ये तडीपार आरोपीला केले अटक
•Ulhasnagar Tadipar News आरोपीला दोन वर्षासाठी चार जिल्हे आणि दोन तालुक्यातून केले होते हद्दपार
उल्हासनगर :- राज्यात लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाले आहे.शहरातील वाढती गुन्हेगारी रोखण्याकरिता पोलिसांकडून विविध उपाय योजना केल्या जात आहे. ठाणे शहराचे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी शहरातील तडीपार आरोपींची यादी समोर घेऊन जे तडीपार आरोपी आहेत ते विनापरवाना शहरांमध्ये प्रवेश करत असाल तर त्यांना त्वरित अटक करण्याच्या सूचना दिल्या आहे. मध्यवर्ती पोलिसांनी मनाई आदेश भंग करणाऱ्या एका आरोपीला उल्हासनगरमधून अटक केली आहे. Ulhasnagar Tadipar News
आरोपी नितीन पिराजी आंबेकर, (30 वर्षे) यास पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-4, उल्हासनगर यांनी ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगरे आणि रायगड जिल्हयातील कर्जत व पनवेल तालुका या महसुली हद्दीतुन दोन वर्षे कालावधीकरिता हद्दपार करण्याचे आदेश, 30 जानेवारी 2023 अन्वये दिले होते. परंतू आरोपी याने त्यास सदर महसुली जिल्हयामध्ये पोलीस आयुक्त, ठाणे शहर व पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-4, उल्हासनगर यांचे परवानगीशिवाय प्रवेश करण्यास मनाई असताना सदर मनाई आदेशाचा भंग करून, 4 एप्रिल रोजी दुपारी 5.45 वा. चे सुमारास, रेती एरिया बंगाली पाडा उल्हासनगर-3 येथे मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे पथकास मिळुन आला. तडीपार आरोपीकडे एक बेकायदेशीर चाकू बाळाला असताना मध्यवर्ती पोलिसांच्या पथकाने आरोपीला अटक केली आहे.प्रकाराबाबत सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादी वरून आरोपीविरूध्द गुन्हा भारतीय हत्यार कायदा कलम 4,25 सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 142,37(1),135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन, आरोपी नितीन पिराजी आंबेकर, यास अटक करण्यात आली आहे. सदर गुन्हयाचा तपास पोलीस हवालदार जाधव हे करीत आहेत. Ulhasnagar Tadipar News