मुंबई

Ulhasnagar Tadipar News : उल्हासनगर मध्ये तडीपार आरोपीला केले अटक

•आरोपीला दोन वर्षासाठी चार जिल्हे आणि दोन तालुक्यातून केले होते हद्दपार

उल्हासनगर :- राज्यात लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून हिललाईन पोलीस ठाणे अनेक मोठमोठ्या घडामोडी घडल्या आहेत. शहरातील वाढती गुन्हेगारी रोखण्याकरिता पोलिसांकडून विविध उपाय योजना केल्या जात आहे. ठाणे शहराचे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी शहरातील तडीपार आरोपींची यादी समोर घेऊन जे तडीपार आरोपी आहेत ते विनापरवाना शहरांमध्ये प्रवेश करत असाल तर त्यांना त्वरित अटक करण्याच्या सूचना दिल्या आहे. हिललाईन पोलिसांनी मनाई आदेश भंग करणाऱ्या एका आरोपीला उल्हासनगरमधून अटक केली आहे.

आरोपी सोनु रामसुहारी कोरी, (26 वर्षे) यास पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-4, उल्हासनगर यांनी ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगरे आणि रायगड जिल्हयातील कर्जत व पनवेल तालुका या महसुली हद्दीतुन दोन वर्षे कालावधीकरिता हद्दपार करण्याचे आदेश, 22 जुन 2022 अन्वये दिले होते. परंतू आरोपी याने त्यास सदर महसुली जिल्हयामध्ये पोलीस आयुक्त, ठाणे शहर व पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-4, उल्हासनगर यांचे परवानगीशिवाय प्रवेश करण्यास मनाई असताना सदर मनाई आदेशाचा भंग करून, 3 एप्रिल रोजी दुपारी 1.45 वा. चे सुमारास, उल्हासनगर-5 येथे गुन्हे शाखा, घटक-4, उल्हासनगर चे पथकास मिळुन आला.प्रकाराबाबत सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादी वरून आरोपीविरूध्द गुन्हा महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 142 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन, आरोपी सोनु रामसुहारी कोरी, यास अटक करण्यात आली आहे. सदर गुन्हयाचा तपास पोलीस हवालदार बागुल हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0