क्राईम न्यूजठाणेमुंबई

Ulhasnagar Police News : उल्हासनगरात गावठी दारूची हातभट्टी उध्वस्त; 2.82 लाखाचा गावठी दारूचा साठा जप्त

Ulhasnagar Police Latest News : पोलिसांनी तब्बल 2 लाख 82 हजार रुपये किंमतीचा दारूचा कच्चा साठा जप्त करून उध्वस्त केला. आठ जणांवर गुन्हा दाखल केला.

उल्हासनगर :- उल्हासनगर गुन्हे शाखा कक्ष-4 Ulhasnagar Crime Branch Unit 4 पोलिसांनी द्वारलीगाव गावठी दारूचा हातभट्टी अड्डा उद्धवस्त Gavathi Hatbhatti Busted करून 2 लाख 82 हजार किंमतीचा साठा जप्त केला. याप्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात Hil Line Police Station 8 जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

उल्हासनगर हिललाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील व्दारली गावठी दारूचा हातभट्टी अड्डा असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यावर, पोलिसांनी गावाच्या झाडाझुडुपा मध्ये सुरू असलेल्या हातभट्टी गावठी दारूच्या अड्ड्यावर धाड टाकली. कारवाई वेळी हातभट्टीवर काम करणारे पळून गेले. पोलिसांनी तब्बल 2 लाख 82 हजार रुपये किंमतीचा दारूचा कच्चा साठा जप्त करून उध्वस्त केला. याप्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65(क),(फ) प्रमाणे आठ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

पोलीस पथक
अमरसिंग जाधव, पोलीस उप आयुक्त, (गुन्हे), शेखर बागडे, सहाय्यक पोलीस आयुक्त (शोध- 1) यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरिक्षक अशोक कोळी, पोलीस उपनिरीक्षक प्रविण खोचरे, सचिन कुंभार, पोलीस हवालदार सुरेश जाधव, विजय जिरे, सतिश सकपाळे, शेखर भावेकर, प्रसाद तोंडलीकर, रामदास उगले, संजय शेरमाळे यांनी केलेली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0