मुंबई

Ulhasnagar News : जन्मठेपेचा कैदी ‘ओपन जेल’मधून पळाला, उल्हासनगरात अटक

•येरवडा कारागृहातून फरार आरोपी पोलिसांच्या जाळ्यात; गुन्ह्यांमागची कबुली

उल्हासनगर :- जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना येरवडा ओपन जेलमधून फरार झालेल्या आरोपीला उल्हासनगर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने सापळा रचून अटक केली. त्याच्याकडून चोरीस गेलेली ॲक्टीवा मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे.या अटकेमुळे दोन पोलीस ठाण्यांच्या गुन्ह्यांचा तपास एकत्र गुंफला गेला असून, आरोपीची पार्श्वभूमी खळबळजनक आहे.

दुर्गामाता नगर परिसरातून मोटरसायकलसह अटक

दि. 16 जुलै 2025 रोजी उल्हासनगर पोलीस ठाण्यात भा.न्या.सं. कलम 303(2) अन्वये मोटरसायकल चोरीचा गुन्हा दाखल झाला होता.तपासादरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी दुर्गामाता नगर, खेमानी, उल्हासनगर-1 परिसरात सापळा रचून आरोपी अनिल मेघदास पटेनिया (वय 28, रा. म्हारळगाव, ता. कल्याण) यास रंगेहाथ अटक केली.
त्याच्याकडून ॲक्टीवा मोटारसायकल जप्त करण्यात आली.

जन्मठेपेचा गुन्हेगार, येरवड्यातून पळाल्याची कबुली

आरोपीकडे अधिक तपास केल्यावर तो येरवडा कारागृहातून (पुणे) पळालेला जन्मठेपेचा कैदी असल्याचे उघड झाले.टिटवाळा पोलीस ठाण्यात भा.दं.वि. कलम 302 अंतर्गत खुनाच्या प्रकरणात शिक्षा भोगत असताना तो ओपन जेलमधून पळाला होता.या संदर्भात येरवडा पोलीस ठाण्यात पुणे येथे भा.न्या.सं. कलम 262 नुसार गुन्हा आधीच दाखल करण्यात आला आहे.

आरोपीस उल्हासनगर पोलीस ठाण्याच्या चोरीप्रकरणी 17 जुलै रोजी रात्रीच्या सुमारास अटक करण्यात आली असून, दि. 18 जुलैपर्यंत पोलिस कोठडी रिमांड मंजूर करण्यात आला आहे.

सदर यशस्वी कारवाई पोलीस आयुक्त, ठाणे शहर,अपर पोलीस आयुक्त, कल्याण प्रादेशिक विभाग संजय जाधव,पोलीस उप आयुक्त परिमंडळ-4 उल्हासनगर सचिन गोरे,
मा. सहायक पोलीस आयुक्त उल्हासनगर अमोल कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

प्रमुख अधिकारी व कर्मचारी: विष्णु ताम्हाणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, उल्हासनगर पोलीस ठाणे,अंकुश म्हस्के, पोलीस निरीक्षक (गुन्हे), पोलीस उपनिरीक्षक पी. के. नवले, पोलीस हवालदार सुजित भोजणे, प्रमोद कांबळे, भगवान पाटील, विलास पाडेकर, सिद्धार्थ गायकवाड, संदिप सोनवणे, संदिप शेकडे, राजू तडवी यांनी आरोपीला अटक केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0