Ulhasnagar News : उल्हासनगरात पकडला तब्बल 4 किलो 300 ग्रॅम गांजा ; उल्हासनगर पोलिसांची धडक कारवाई

•Ulhasnagar Drugs News उल्हासनगर कॅम्प नं-1 आयडिया कंपनीच्या गेट जवळील परिसतात गांजा विक्री करण्यासाठी येत असल्याची माहिती उल्हासनगर पोलिसांना मिळाली.
उल्हासनगर :- उल्हासनगर पोलिसांनी तब्बल 4 किलो 300 ग्रॅम वजनाचा अंमली पदार्थ ( गांजा) पोलिसांनी जप्त केला आहे. उल्हासनगर पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये एका व्यक्तीकडून विक्रीसाठी आणलेला चार किलो 342 ग्रॅम गांजा उल्हासनगर-1 आयडिया कंपनीचे गेट जवळून जप्त केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उल्हासनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्रीवास यांना मिळालेल्या गोपनीय बातमीवरून उल्हासनगरच्या आयडिया कंपनीच्या गेट जवळ एक व्यक्ती गांजा विक्री करण्यासाठी येणार असल्याची खात्रीदायक माहिती मिळाली होती. उल्हासनगर पोलिसांच्या तपास पथकाने आयडिया कंपनीच्या गेट जवळ गुलशन नगर येथे सापळा रचून मोहन उर्फ लासी परशुराम हेमवाणी (48 वय रा. शिरू चौक, उल्हासनगर-1) याला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी आरोपीची अंगझडती घेतली असता तिच्याजवळ 86 हजार 840 रुपये किंमतीचा 4.342 किलो ग्रॅम गांजा अंमली पदार्थ आढळून आला आहे. पोलिसांनी आरोपीकडून रोख रक्कम मोबाईल फोन आणि बगमॅन स्कुटी असा एकूण एक लाख 46 हजार 840 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांनी आरोपीच्या विरोधात एनडीपीएस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस पथक
सचिन गोरे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-4 उल्हासनगर, अमोल कोळी, सहाय्यक पोलीस आयुक्त, उल्हासनगर यांचे मार्गदर्शनाखाली विष्णु ताम्हाणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, उल्हासनगर पोलीस ठाणे, पोलीस उप निरीक्षक एल आर सातपुते, सहाय्यक पोलीस उप निरीक्षक श्रीवास, पोलीस हवालदार मुलाणी, गायकवाड, पोलीस नाईक खैरणार, पोलीस शिपाई जाधव, पाटील यांनी केली आहे.