
Ulhasnagar Fake Doctor Scam : उल्हासनगर महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात 18 बोगस डॉक्टरांवर आरोग्य विभागाच्या सहाय्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे
उल्हासनगर :- उल्हासनगर मधून डॉक्टरांच्या बाबतीत एक खळबळ जनक बातमी समोर आली आहे. Ulhasnagar Fake Doctor Scam उल्हासनगर महापालिका क्षेत्रात 26 बोगस डॉक्टरांची यादी जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली होती. उल्हासनगर महापालिका Ulhasnagar BMC क्षेत्रातील 18 बोगस डॉक्टरांवर उल्हासनगर महापालितेच्या आरोग्य विभागाच्या पुढाकाराने गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पालिकेच्या आरोग्य विभागाने केलेल्या पडताळणीत त्यातील चार दवाखाने बंद असल्याचे दिसून आले तर तीनच डॉक्टर महाराष्ट्र आरोग्य परिषदेकडे नोंदणीकृत असल्याचे दिसून आले.
महापालिकेला प्राप्त यादीनुसार 26 डॉक्टरांपैकी एकुण 18 बोगस डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. उर्वरित 8 डॉक्टारांपैकी 3 डॉक्टर महाराष्ट्र आरोग्य परिषदेकडे नोंदणीकृत आहेत. तर 4 डॉक्टरांच्या दवाखान्यांची पाहणी केली असता त्या ठिकाणी त्यांचे दवाखाने बंद असल्याचे आढळून आले. तर एक डॉक्टर कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात येत असल्याने त्या डॉक्टरवर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमार्फत कार्यवाही करण्यात आलेली आहे, अशी माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे.