क्राईम न्यूजठाणेमुंबई
Trending

Ulhasnagar Firing News : कौटुंबिक वादातून उल्हासनगरमध्ये गोळीबार; एकाचा मृत्यू, दुसरा गंभीर जखमी

Ulhasnagar Latest Firing News : ‘साईनाथ कॉलनी’तील घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण

उल्हासनगर :- शहरात पुन्हा एकदा गुन्हेगारीने डोके वर काढले असून, कौटुंबिक वादातून गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हिललाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील साईनाथ कॉलनीमध्ये बुधवारी रात्री हा प्रकार घडला, ज्यात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. Ulhasnagar Latest Firing News

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मोनू शेख याने कौटुंबिक वादातून आपल्या मेव्हण्यावर, योगेश मिश्रा याच्यावर गोळीबार केला. गोळी लागल्याने योगेश मिश्राचा जागीच मृत्यू झाला आहे. त्याच वेळी, गोळीबारादरम्यान आणखी एका व्यक्तीवर तलवारीने हल्ला करण्यात आला असून, तोही जखमी झाला आहे.

घटनेची माहिती मिळताच हिललाईन पोलिसांचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून फरार आरोपी मोनू शेख याचा शोध सुरू केला आहे. आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांची अनेक पथके विविध ठिकाणी रवाना झाली आहेत.

या घटनेबाबत परिमंडळ चारचे पोलिस उपायुक्त सचिन गोरे यांनी सांगितले की, “हा प्रकार कौटुंबिक वादातून घडला आहे. मृत व्यक्ती आरोपीचा मेव्हणा असल्याचे समोर आले आहे. हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीला लवकरच ताब्यात घेतले जाईल.” या घटनेमुळे साईनाथ कॉलनी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांनी परिसरातील गस्त वाढवली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0