Ulhasnagar Crime News : उल्हासनगर : अनैतिक संबंधवरून तलवारीने खून
Ulhasnagar Crime News : आरोपी महिला आणि तिच्या आठ साथीदारांनी तलवारी आणि चाकू हल्ला करत प्रियकराला ठार मारले, कुटुंबीयांनाही जीवे ठार मारण्याची धमकी!
उल्हासनगर :- अनैतिक संबंधातून प्रियकराला आरोपी महिला यांच्या आठ साथीदारांनी चाकू आणि तलवारीने वार करत जिवे ठार मारले आहे. Ulhasnagar Crime News या घटनेनंतर कुटुंबीयातील सदस्यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली आहे. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा Police Station दाखल करण्यात आला असून महिला आणि त्याच्या साथीदाराला अटक केली आहे इतर साथीदारांचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा BNS 103(1),109,115(2) ,352, 351(3)189(1),189(2)190,191(2),49 मपोका 37(1)135 सह भारतीय हत्यार कायदा 4,25 मधील अरविंद पन्नालाल चौधरी (वय 50 रा उल्हासनगर-3) याचा मयत भाऊ अजय पन्नालाल चौहान याचे व आरोपी ममता सिंग उर्फ बबली याचे असलेले अनैतिक संबंधा वरून आरोपी दत्ता कासुंदे व इतर 8 आरोपीत यांनी चाकूने,तलवारीने जीवे ठार मारले बाबत व फिर्यादी यांची पत्नी मोठा भाऊ व पत्नी यांना शिवीगाळ व दमदाटी करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केले आहे.दिलेल्या तक्रारीवरून आज (29 ऑक्टोबर) रोजी पहाटे दरम्यान गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गुन्ह्यातील आरोपी मुकेश कासुदे व आरोपी ममता सिंग उर्फ बबली यास ताब्यात घेण्यात आले असून इतर आरोपी यांचा तांत्रिक दृष्ट्या शोध घेऊन अटक करण्यासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत. इतर आरोपींना लवकरात लवकर अटक करून पुढील कायदेशीर कारवाई करीत आहोत.