•Ulhasnagar Crime News मनाई आदेश भंग करणाऱ्या आणि बेकायदेशीर रित्या तलवार बाळगणाऱ्या एका आरोपीला उल्हासनगर पोलिसांनी केले अटक
उल्हासनगर :- आरोपी याला ठाणे, मुंबई, मुंबई उपनगर आणि रायगड जिल्ह्यातून तसेच कर्जत व पनवेल या तालुक्यातून दोन वर्षांच्या कालावधी करिता तडीपार करण्यात आले होते. परंतु आरोपी हा बेकायदेशीररित्या शहरांमध्ये वावर करतच होता. मनाई आदेश भंग करणाऱ्या आरोपीला उल्हासनगर पोलिसांनी अटक केली आहे.तसेच आरोपीकडे बेकायदेशीर रित्या तलवार ही जवळ असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. विविध गुन्ह्यामध्ये आरोपी असलेल्या सनामनी उर्फ आशिष बिपिन झा (22 वर्ष) याला पोलीस उप आयुक्त परिमंडळ 4 यांनी पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या निर्देशालाखाली 12 ऑक्टोबर 2023 रोजी दोन वर्षाच्या कालावधी करिता हद्दपार करण्यात आले होते. परंतु आपला कालावधी पूर्ण होण्यापूर्वीच शहरात वावर असल्याने पोलिसांनी तडीपार आरोपीच्या मुस्क्या आवळल्या आहे.
तडीपार आरोपीला तलवारीसह अटक
तडीपार आरोपी सनामनी उर्फ आशिष बिपिन झा याला तडीपार केले असतानाही मनाई आदेश भंग करून उल्हासनगर मध्ये वावर होता. उल्हासनगर पोलीस ठाणे यांना मिळालेल्या माहितीनुसार आरोपीला उल्हासनगर-2 मधून 02 जुलै रोजी रात्री 11.35 वाजल्याच्या सुमारास अटक केली आहे. आरोपीची तपासणी केली असता त्याच्याकडे एक बेकायदेशीररित्या तलवार जवळ बाळगली होती, पोलिसांना आढळून आले आहे. पोलिसांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी विरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37 (1),135 सह भारतीय हत्यार कायदा कलम 4, 25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी आशिष याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस हवालदार भोजने हे करत आहे.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…