Ulhasnagar Crime News : धक्कादायक! जेवणाच्या वादातून मित्रानेच केला मित्राचा खून..
•जेवणाच्या वादातून मित्रानेच मित्राचा खून केल्याची धक्कादायक घटना उल्हासनगरच्या मध्यवर्ती पोलीस ठाण्यात उघड झाली आहे. पोलिसांनी केवळ दोन तासात आरोपीला ताब्यात घेतले
उल्हासनगर :- उल्हासनगर मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे हद्दीत जेवणाच्या वादातून मित्रानेच मित्राचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने पोलिसांनी केवळ दोन तासात आरोपीला ताब्यात घेतले आहे. आरोपीचे नाव अफरोज मोहम्मद याकूब शेख उर्फ राहुल (24 वय रा व. पंचशील नगर उल्हासनगर-3) आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,मध्यवर्ती पोलीस स्टेशन गुन्हा BNS 103(1) मधील फिर्यादी इस्माईलबी सुलतान शेख (वय 41 रा. हिराघाट उल्हासनगर -3) यांनी 28 ऑक्टोबरच्या सकाळीच्या दरम्यान त्याचा भाऊ राजेसाब इब्राहिम शेख (वय 47) याला काजल पेट्रोल पंपा जवळील रस्त्याच्या बाजूला कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणाकरिता कशाने तरी डोक्यात दुखापत करून व गळ्याभोवती प्लास्टिक गोणी गुंडाळून जीवे ठार मारल्या बाबत दिलेल्या तक्रारीवरून (28 ऑक्टोबर) दुपारच्या दरम्यान गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तक्रारी मध्ये आरोपी हा अज्ञात असल्यामुळे गुन्हे शोध पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी सीसीटीव्ही फुटेज, आजूबाजूस माहिती व तांत्रिक विश्लेषानानुसार नमूद आरोपी त्याची माहिती काढून दोन तासाचे आत आरोपी अफरोज मोहम्मद याकुब शेख ऊर्फ राहुल, यांस ताब्यात घेण्यात आलेले असून त्याच्याकडे केलेल्या चौकशीमध्ये मयत व आरोपी हे मित्र असून त्यांचेत जेवण्याच्या वादावरून त्यास दगडाने ठार मारले बाबत सांगून गुन्ह्याची कबुली दिलेली दिलेली आहे.नमूद गुन्ह्यात पुढील तपास मध्यवर्ती पोलीस ठाणे करीत आहे.