Ulhasnagar Crime News : पिस्तूल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला बेड्या
गुन्हे शाखा कक्ष-4, उल्हासनगर यांची कारवाई पिस्तुलासह काडतूस जप्त
उल्हासनगर :- सराईत गुन्हेगाराने बेकायदेशीररित्या पिस्तूल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखा कक्ष-4 पोलिसांनी सापळा रचून अटक केली. त्याच्याकडून एक पिस्तूल व दोन जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे. नेवाळी नाका परिसरात ही कारवाई करण्यात आली आहे.
राज्यात विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यापासून बेकायदा हत्यारे ओळखणाऱ्या विरुद्ध कारवाईचा बडगा उभारला आहे. भगवती सबाजीत यादव (वय 24, रा. कात्रज पाडा बदलापूर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. भगवती हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर बदलापूर पोलीस ठाण्यात अशाच प्रकारे अवैध हत्यारे बाळाकडे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हे शाखा कक्ष-4 मधील पोलीस हवालदार गणेश गावडे यांना हॉटेल साईनाथ पॅलेस रेस्टॉरंट ॲण्ड बार, नेवाळी नाका अंबरनाथ येथे भगवती यादव नावाचा व्यक्ती जेवणाकरिता बसला आहे. परंतु त्याच्याकडे देशी बनावटीचे पिस्तूल असल्याची माहिती मिळाली होती.त्यानुसार, पथकाने सापळा रचून संशयिताला पकडले. त्याची झडती घेतली असता त्याच्याजवर एक गावठी पिस्तूल व दोन जिवंत काडतूस मिळाले. अधिक माहिती तो सराईत गुन्हेगार साईनाथ असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, त्याने पिस्तूल कोणाकडून आणलेल, याबाबत चौकशी करण्यात येत आहे. याप्रकरणी उल्हासनगरच्या हिल लाईन पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम 3,25 महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37 (1), 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.