मुंबई

Ulhasnagar Crime News : मोटार सायकल चोरी करणाऱ्या अटक, आठ मोटार सायकल जप्त

•शहरात मोटर सायकल चोरीच्या घटना वाढत असतानाच एका मोटर सायकल चोरीच्या गुन्ह्याचा तपासात उल्हासनगर पोलिसांनी मोटारसायकल चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्यामध्ये अल्पवयीन गुन्हेगाराचा ही समावेश

उल्हासनगर :- शहरात मोटर सायकल चोरीच्या घटना वाढत असतानाच एका मोटर सायकल चोरीच्या गुन्ह्याचा तपासात उल्हासनगर पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट-4 पोलिसांनी मोटारसायकल चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्यांच्या ताब्यातून 3.90 लाख रुपये किंमतीच्या आठ मोटार सायकल हस्तगत करण्यात यश मिळविले असल्याची माहिती सोमवारी दिली आहे.

गुन्हे शाखा युनिट-4, उल्हासनगर पोलिसांना गुप्त बातमी मिळाली होती. अमरडे कंपनीजवळ उल्हासनगर नदीकडे जाणाऱ्या रोडवर सहा ते सात व्यक्ती चोरीची दुचाकी घेऊन फिरत असल्याचे माहिती मिळाली होती. या बातमीच्या आधारे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बांडे व त्यांच्या बदकाने त्या ठिकाणी सापळा रसूल संशयित आरोपी हर्षद भरत सुपे (19 वय रा. गायकवाड पाडा विठ्ठलवाडी मंदिर जवळ उल्हासनगर-5) याला ताब्यात घेतले. संशयित आरोपी सुपे यांनी आपल्या अल्पवयीन साथीदाराच्या मदतीने पडघा, कल्याण तालुका पोलीस ठाणे, वर्तक नगर पोलीस ठाणे येथे दुचाकी चोरी केल्याचे कबूल केले आहे. तसेच आरोपीच्या ताब्यातून तीन लाख 90 हजार रुपयांच्या आठ मोटरसायकल जप्त केले आहे. आरोपीच्या विरोधात विठ्ठलवाडी, हिललाईन, कल्याण तालुका, पडघा, वर्तक नगर असे विविध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याचे पोलिसांच्या तपासून निष्पन्न झाले आहे. अल्पवयीन आरोपीच्या गुन्ह्याबाबत समजपत्रासह पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. तर सुपे याला मुद्देमालासह विठ्ठलवाडी पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

पोलीस पथक

अमरसिंह जाधव, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) शेखर बागडे, सहाय्यक पोलीस आयुक्त, (शोध-1) यांच्या मार्गदर्शनाखाली, गुन्हे शाखा, घटक-4, उल्हासनगर येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी, सहाय्यक पोलीस उप निरीक्षक बांडे, सहायक पोलीस उप निरीक्षक पवार, पोलीस हवालदार थोरवे, गणेश गावडे, योगेश वाघ, मंगेश जाधव, अमर कदम, रितेश वंजारी, पोलीस शिपाई संजय शेरमाले, प्रसाद तोंडलिकर व रामदास उगले,अविनाश पवार यांचे पथकाने केली आहे.

vivek

Recent Posts