•आरोपीला दोन वर्षासाठी चार जिल्हे आणि दोन तालुक्यातून केले होते हद्दपार
उल्हासनगर :- राज्यात लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाले आहे.शहरातील वाढती गुन्हेगारी रोखण्याकरिता पोलिसांकडून विविध उपाय योजना केल्या जात आहे. तडीपार आरोपींना शहरातून हद्दी पार केले असले तरी सर्रास पोलिसांचे परवानगी न घेता शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर वावरत असताना दिसत आहे. अशा तडीपार गुंडास ठाणे शहराचे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी शहरातील तडीपार आरोपींची यादी समोर घेऊन जे तडीपार आरोपी आहेत ते विनापरवाना शहरांमध्ये प्रवेश करत असाल तर त्यांना त्वरित अटक करण्याच्या सूचना दिल्या आहे. उल्हासनगर पोलिसांनी मनाई आदेश भंग करणाऱ्या एका आरोपीला उल्हासनगरमधून अटक केली आहे.
आरोपी हंशु बिपीन झा, (20 वर्षे) यास पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-4, उल्हासनगर यांनी ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगरे आणि रायगड जिल्हयातील कर्जत व पनवेल तालुका या महसुली हद्दीतुन दोन वर्षे कालावधीकरिता हद्दपार करण्याचे आदेश, 09 मार्च 2024 अन्वये दिले होते. परंतू आरोपी याने त्यास सदर महसुली जिल्हयामध्ये पोलीस आयुक्त, ठाणे शहर व पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-4, उल्हासनगर यांचे परवानगीशिवाय प्रवेश करण्यास मनाई असताना सदर मनाई आदेशाचा भंग करून, 6 एप्रिल रोजी दुपारी 2.30 वा. चे सुमारास, दुर्गामातानगर कमानीच्या बाजुला उल्हासनगर-2 येथे उल्हासनगर पोलीस ठाण्याचे पथकास मिळुन आला. तडीपार आरोपीकडे एक बेकायदेशीर चाकू बाळगला असताना उल्हासनगर पोलिसांच्या पथकाने आरोपीला अटक केली आहे.प्रकाराबाबत सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादी वरून आरोपीविरूध्द गुन्हा भारतीय हत्यार कायदा कलम 4,25 सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 142,37(1),135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन, आरोपी हंशु झा, यास अटक करण्यात आली आहे. सदर गुन्हयाचा तपास पोलीस नाईक धोधडे हे करीत आहेत.
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…