Ujjain’s Mahakaleshwar Temple : महाकालेश्वर मंदिराचा मोठा खुलासा, एका महिन्यात 3 कोटी 80 लाखांची फसवणूक, आणखी दोन कर्मचाऱ्यांना अटक
Ujjain’s Mahakaleshwar Temple Scam : महाकालेश्वर मंदिरातील समितीच्या उत्पन्नात भाविकांच्या संख्येनुसार 3 कोटी 80 लाख रुपयांची घट झाली आहे. आता हे पैसे कोणाच्या खिशात गेले? याचा खुलासा जिल्हा प्रशासनाकडून होऊ शकतो.
ANI :- उज्जैनचे महाकालेश्वर मंदिर Ujjain’s Mahakaleshwar Temple दरवर्षी 100 कोटी रुपयांहून अधिक देणगी येत असते. भाविकांचे जलद दर्शन, लाडू प्रसाद, अभिषेक आणि देणगीदारांनी दिलेल्या रकमेतून हे उत्पन्न मिळते. महाकालेश्वर मंदिर समिती ही रक्कम मंदिराच्या विकासासाठी व इतर महत्त्वाच्या कामांसाठी वापरते.
महाकालेश्वर मंदिर समितीचे अध्यक्ष आणि जिल्हाधिकारी नीरज कुमार सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून मंदिरातील उत्पन्नात सातत्याने घट होत होती. या प्रकरणाची चौकशी केली असता काही कर्मचारी व पुजारी अवैधरित्या पैसे घेत असल्याचे आढळून आले.
मंदिरात येणाऱ्या भाविकांच्या संख्येनुसार उत्पन्नाचे मूल्यांकन केल्यास सुमारे 3 कोटी 80 लाख रुपयांची घट झाल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकरणी गुरुवारी महाकाल पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला असून त्यात पुरोहित आणि त्यांच्या प्रतिनिधींना अटक करण्यात आली आहे.
आता आणखी एक गुन्हा दाखल होणार आहे. यामध्ये महाकालेश्वर मंदिराचे दोन कर्मचारी विनोद चौकसे आणि राकेश श्रीवास्तव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येत आहे. दोन्ही कर्मचाऱ्यांच्या सेवाही समाप्त करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
पोलिस अधीक्षक प्रदीप शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही कर्मचाऱ्यांविरुद्ध महाकाळ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात येणार आहे. भाविकांकडून पैसे घेऊन त्यांना सुविधा देण्याच्या प्रकरणात महाकालेश्वर मंदिराच्या माजी प्रशासकाने मंदिरात दररोज सुमारे 20 लाख रुपयांचा भ्रष्टाचार होत असल्याचे सांगितले होते.