Uddhav Thackeray On Eknath Shinde : “दोन-दोन उपमुख्यमंत्रिपदे तयार करता, मग विरोधी पक्षनेतेपद द्यायला का घाबरता?” भास्कर जाधवांच्या नावावरून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल; शिंदेंना डिवचल्याची राजकीय चर्चा
नागपूर :- नागपूरमध्ये सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात Winter Session सहभागी होण्यासाठी पोहोचलेले शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे Uddhav Thackeray यांनी आज पत्रकार परिषदेतून सत्ताधारी महायुतीवर आणि विशेषतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार शाब्दिक प्रहार केला.
सध्या विधानसभेत रिक्त असलेल्या विरोधी पक्षनेतेपदाच्या नेमणुकीवरून उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांना घेरले. त्यांनी या पदावर निर्णय न घेतल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, “गेल्या वर्षी मी म्हटलं होतं की विरोधी पक्षनेते पदावर आम्ही दावा सांगितला होता. भास्कर जाधव यांचं नावही सूचवलं आहे, पण उत्तर आलं नाही.”
यावर टीका करताना त्यांनी थेट उपमुख्यमंत्रिपदाच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “नियम असला काय नसला तरी दोन, दोन उपमुख्यमंत्रिपदं तयार केली जातात. मग विरोधी पक्षनेतेपद द्यायला घाबरता का?” असा सवाल त्यांनी केला. पुढे त्यांनी मागणी केली की, “विरोधी पक्षनेतेपद दिले जात नसेल तर मग असंवैधानिक असलेले उपमुख्यमंत्रिपदही काढून टाका. त्या त्या खात्याच्या नावाने मंत्री ओळखला गेला पाहिजे.”
यावेळी त्यांनी भाजपच्या ‘नंबर एक’ आणि ‘नंबर दोन’च्या राजकारणावरही टोला लगावला. “भाजपाच्या नेत्यांनीच सांगितलं आहे की नंबर एकलाच महत्त्व असतं. नंबर दोनचं महत्त्व नाही,” असे त्यांनी म्हटले. उद्धव ठाकरे यांची ही टोलेबाजी सध्या उपमुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदे यांच्यासाठीच आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…