मुंबई

Uddhav Thackeray : “शिक्षकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न फसवणार!” — उद्धव ठाकरे आझाद मैदानात निर्धाराने

Uddhav Thackeray : शिक्षक आंदोलनात शिवसेना (ठाकरे) प्रमुखांची रोखठोक टीका — “दिल्लीच्या गुलामांमुळे अन्याय सुरू”

मुंबई | “मातृदेवो भव, पितृदेवो भव, गुरुदेवो भव” ही आपली संस्कृती असताना, सत्ताधाऱ्यांना गुरूंचं स्थान समजत नाही. त्यांचे गुरू दिल्लीला बसले आहेत आणि त्यांच्या आदेशावरूनच शिक्षकांवर अन्याय सुरू आहे!” — अशा शब्दांत शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे Uddhav Thackeray यांनी बुधवारी सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका केली.

राज्यातील विनाअनुदानित व अंशतः अनुदानित शाळांच्या शिक्षकांनी आझाद मैदानात आपल्या मागण्यांसाठी आंदोलन पुकारले असून, त्यांना वाढता राजकीय पाठिंबा मिळतो आहे. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी आंदोलनस्थळी भेट देत शिक्षकांच्या एकजुटीचे कौतुक केले आणि “हा लढा जिंकेपर्यंत शिवसेना तुमच्या खांद्याला खांदा लावून उभी राहील,” असं ठाम आश्वासन दिलं.

दिल्लीच्या गुलामांना एकच धडा शिकवा!

ठाकरे यांनी स्पष्ट शब्दांत म्हटलं की, “महाराष्ट्रातील भूमिपुत्रांना चिरडण्याचा विडा काही दिल्लीच्या गुलामांनी उचलला आहे. आपण सर्वांनी एकत्र येऊन त्यांना उत्तर द्यायला हवं.”

या वेळी त्यांनी आझाद मैदानात माईकची यंत्रणा बंद केल्यावर संताप व्यक्त करत “आपला आवाज कोणीही बंद करू शकत नाही!” असं आवाहन केलं. तसेच, “या मैदानात लवकरच विजय साजरा करण्यासाठी पुन्हा भेटू,” असा विश्वासही व्यक्त केला.

राजकीय पाठिंब्यामुळे शिक्षकांमध्ये नवा जोश

या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) देखील आक्रमकपणे उतरला आहे. खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार, माजी आमदार श्रीकांत देशपांडे, शिक्षक आमदार ज. मू. अभ्यंकर, कोकणातील आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे आणि इतर अनेक पदाधिकारी आंदोलनात सहभागी झाले आहेत. शरद पवार यांनीही सकाळी आंदोलनस्थळी जाऊन शिक्षकांची भेट घेतली.

मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये शासनाने टप्प्याटप्प्याने अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, अद्यापही अंमलबजावणी न झाल्याने शिक्षकांमध्ये प्रचंड असंतोष आहे.

vivek

Recent Posts