मुंबई

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना इशारा: “तुमच्या बुडाला आग लागेल,” निवडणूक आयोग ‘गब्बर’पेक्षाही वाईट

Uddhav Thackeray On Election Commission : “पक्ष, निशाणी चोरली, आता मतदान चोरी करत आहात”; मुख्यमंत्र्यांना आव्हान देत ठाकरे यांनी मागितल्या मतदारांच्या घरांची तपासणीची मागणी

मुंबई :- मतदार यादीतील गैरव्यवहार आणि मतचोरीच्या विरोधात आज (1 नोव्हेंबर) मुंबईत झालेल्या ‘सत्याच्या मोर्चा’दरम्यान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे Uddhav Thackeray यांनी सत्ताधारी महायुतीवर आणि निवडणूक आयोगावर अत्यंत आक्रमक शब्दांत टीका केली. संयुक्त महाराष्ट्रानंतर ही पहिली राजकीय एकजूट असून, ही लोकशाहीचे प्रतिनिधित्व करणाऱ्यांची एकजूट असल्याचे त्यांनी नमूद केले.

‘गब्बर’ आणि ‘ॲनाकोंडा’चा इशारा

ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर थेट हल्ला चढवला. “आज ठिणगी बघत आहात. या ठिणगीची आग कधी होईल सांगता येत नाही. तुमच्या बुडाला आग लागेल.” असे सांगत त्यांनी एक प्रसिद्ध डायलॉग वापरला, “दूर गाव में बच्चा रोता है तो मां कहती है, सो जा नही तो गब्बर आयेगा. तसं सांगतो, सावध राहा. नाहीतर ॲनाकोंडा येईल,” असा इशारा दिला.

निवडणूक आयोगावर टीका

राज ठाकरे यांनी केलेल्या प्रयत्नानंतरही निवडणूक आयोग ऐकत नसल्याचे सांगत उद्धव ठाकरे म्हणाले, “निवडणूक आयोग हा यांचा नोकर आहे. मी ॲनाकोंडा का म्हणतोय, यांची भूक थांबत नाही.” त्यांनी आरोप केला की, “आपला पक्ष, निशाणी चोरली. वडील चोरत आहेत. ते पुरत नाही म्हणून आता मतदान चोरी करत आहेत.”

मुख्यमंत्र्यांना आव्हान

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना आव्हान दिले, “तुम्ही आमचा पर्दाफाश करा. एकदाचं करूनच टाका. दूध का दूध पानी का पानी होऊ द्या.” मुख्यमंत्र्यांचे विधान म्हणजे त्यांना मतचोरी मान्य आहे, असे सूचित करते, अशी टीका त्यांनी केली.

जनतेला तपासणीचे आवाहन

यावेळी त्यांनी जनतेला थेट कृती करण्याचे आवाहन केले. “आज संपूर्ण महाराष्ट्र एकवटला आहे. पक्ष बाजूला ठेवून आपण एकवटलो आहोत. तुम्ही मतदार यादीत नाव आहे की नाही ते तपासा. तुमच्या घरावर कुणाचे नाव तर नाही ना ते तपासा. शौचालयातील लोकांची नावेही तपासा,” असे आवाहन त्यांनी केले.

एका अर्जाचा दाखला देत त्यांनी सांगितले की, एका व्यक्तीच्या नावाने अर्ज करून त्यावर “हा अर्ज आम्ही केला नाही,” असा शेरा मारून तो रद्द करण्यात आला आहे. “ज्याने अर्ज केला नाही, तो उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे, त्यालाच हे माहीत नाही,” आणि त्यावर खोटा फोन नंबर आहे, असे सांगत त्यांनी मतदार याद्यांमधील प्रशासकीय गोंधळ आणि गैरप्रकार उघड करण्याचा प्रयत्न केला.

vivek

Recent Posts