ठाणे

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका; ‘मी इतका हतबल मुख्यमंत्री पाहिला नाही’

Uddhav Thackeray Group : शेतकरी क्रांती संघटना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात विलीन.

मुंबई: आज शेतकरी क्रांती संघटना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात विलीन झाली. या कार्यक्रमादरम्यान बोलताना उद्धव ठाकरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. ‘मी माझ्या आयुष्यात इतका हतबल मुख्यमंत्री कधीच पाहिला नाही,’ असे उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच, ‘कुणी कुणाला जाब विचारू शकत नाही. एखाद्याला त्रास द्यायचा आणि नंतर स्वतःच मध्यस्थी करून आपण त्यांचे कैवारी आहोत असे दाखवण्याचा प्रकार सुरू आहे,’ असा आरोपही त्यांनी केला.

उद्धव ठाकरे यांनी आपल्या पक्षातून फुटून गेलेल्या आमदारांवरही निशाणा साधला. ‘अनेकांना असे वाटते की, उद्धव ठाकरे आणि शिवसेना संपली आहे. पण त्यांना हे कळत नाही की, सगळी माणसं काही पैशांनी विकली जात नाहीत. काही गद्दार विकले जाऊ शकतात, पण निष्ठावंत विकले जाऊ शकत नाहीत,’ असे ते म्हणाले. ‘ज्या लोकांना आपण मोठे केले ते सोडून गेले, पण ज्यांनी त्या लोकांना मोठे केले ते सगळे आजही माझ्यासोबत आहेत,’ असे म्हणत त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवला.

यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी त्यांना मिळालेल्या मुख्यमंत्रीपदाबद्दलही भाष्य केले. ‘मला अनपेक्षितपणे मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारावी लागली. माझ्या काळात झालेल्या एकमेव अधिवेशनात कोणत्याही शेतकऱ्याने कर्जमाफीची मागणी केली नसतानाही मी त्यांना झुलवत न ठेवता कर्जमाफी दिली,’ अशी आठवण त्यांनी करून दिली.

विधानसभा निवडणुकीत झालेल्या निकालावर संशय व्यक्त करत ते म्हणाले, ‘आपल्या महाराष्ट्रातील जनता एवढी उफराटी नाही. काहीतरी गडबड घोटाळा नक्की झाला आहे आणि आता हे घोटाळे एक-एक करून बाहेर येत आहेत.’ ‘लाडक्या बहिणींमध्ये किती पापी घुसलेत, ते कुणी घुसवले,’ असा प्रश्न विचारत त्यांनी निधीवाटपावरूनही सरकारवर हल्लाबोल केला.

vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

4 hours ago