Tejaswi Ghosalkar Meet Uddhav Thackeray : तेजस्वी घोसाळकरांनी सर्व पदांचा राजीनामा दिल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतली.
मुंबई :- दिवंगत शिवसेना नेते अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी आणि शिवसेना (ठाकरे) पक्षाच्या माजी नगरसेविका आणि महिला दहिसर विधानसभाप्रमुख तेजस्वी घोसाळकर Tejaswi Ghosalkar Meet Uddhav Thackeray यांनी पक्षातील सर्व पदांचा राजीनामा दिला. राजीनाम्यानंतर उद्धव ठाकरे यांनी त्यांना भेटायला बोलावले होते. त्यानुसार, आज त्यांनी उद्धव ठाकरेंची भेटही घेतली. या भेटीत त्यांनी त्यांच्या राजीनाम्यावर चर्चा केली. त्यानंतर त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. मी सध्या कोणत्याही पक्षात जाण्याच्या मार्गावर नसल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.
राजीनामा दिल्यानंतर तेजस्वी घोसाळकर भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. त्यांना भाजपाकडून ऑफर आल्याचंही म्हटलं जातंय. त्यावर तेजस्वी घोसाळकर म्हणाल्या, “भाजपात जाण्याबाबत मी कोणताही निर्णय घेतलेला नाही. अजूनही मी ठाकरेंबरोबरच आहे. अजूनही मी गद्दारी केलेली नाही.”
तेजस्वी घोसाळकर म्हणाल्या, “उद्धव ठाकरेंची मी भेट घेतली. आज त्यांनी मला भेटायला बोलावलं होतं. आमच्यात चर्चा झाली आहे. माझ्या समस्या मी त्यांच्यासमोर मांडल्या आहेत. या समस्यांवर उत्तर मिळालं की मी पुढचा निर्णय लवकरात लवकर घेईन.”
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…