Uddhav Thackeray : EVM चा घोटाळा करून भाजप निवडणूक जिंकते ; उद्धव ठाकरे यांचा गंभीर आरोप
Uddhav Thackeray On BJP: उद्धव ठाकरे यांच्या टीकेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून प्रत्युत्तर
मुंबई :- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे चे प्रमुख उद्धव ठाकरे Uddhav Thackeray यांनी काल पत्रकार परिषदेमध्ये ईव्हीएम घोटाळा EVM SCAM संदर्भात भाजपावर मोठा आरोप केला.लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपाला जनतेचा कौल नाही, त्यामुळे हे सरकार सत्तेवर येणार नाही. पण जनतेच्या मनाविरुद्ध, EVM चा घोटाळा करून भाजप जिंकलं तर देशात मोठा असंतोष निर्माण होईल, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला. त्यांच्या या विधानाला भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले. Uddhav Thackeray On BJP
देवेंद्र फडणवीस म्हणाले काय?
हे विरोधक जिंकले तर ईव्हीएम चांगली असते, पण त्याऐवजी जर त्यांचा पराभव झाला तर मात्र ईव्हीएम वाईट. हे असं धोरण आहे यांचं. आता त्यांना माहिती आहे की त्यांचा येत्या निवडणुकीमध्ये दारुण पराभव होणार आहे. त्यामुळे त्यांनी आधीच ईव्हीएमबद्दल नकारात्मक बोलणं सुरू केलं आहे, अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला.ठिकाणी या सर्वांना एकच सवाल आहे. देशाच्या इलेक्शन कमिशनने ओपन चॅलेंज दिला आहे. ईव्हीएम टेम्पर करून दाखवा ? आत्तापर्यंत एकही पॉलिटिकल पार्टी असं काही करू शकलेलं नाही, असंही फडणवीस म्हणाले. Uddhav Thackeray On BJP
उद्धव ठाकरेंनी केली होती टीका
शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यासंदर्भात टीका केली. आज शिवतीर्थ मुक्त संवाद अभियानाचा समारोप झाला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी सरकारववर कडाडून हल्ला चढवला. EVM च्या माध्यमातून संभ्रम पसरवला जातोय. Uddhav Thackeray On BJP