मुंबईठाणे
Trending

Uddhav Thackeray : पावसाची आपत्ती मानवनिर्मित; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल

Uddhav Thackeray Latest News : केशवराव धोंडगेंच्या मुलाचा ठाकरे गटात प्रवेश; मुंबईतील पूरस्थितीवर उद्धव ठाकरेंनी साधला निशाणा

मुंबई :- शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नांदेड आणि मुंबईतील पूरस्थितीवरून राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. शेतकरी कामगार पक्षाचे दिवंगत नेते केशवराव धोंडगे यांचे सुपुत्र पुरुषोत्तम धोंडगे यांच्या पक्षप्रवेशानंतर बोलताना, त्यांनी पावसाने निर्माण झालेली आपत्ती ही ‘मानवनिर्मित’ असल्याचे म्हटले.

‘चोर बाजारा’वरून शिंदेंना टोला

उद्धव ठाकरे यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवरही भाष्य केले. “राजकारणात सध्या जो काही धुमाकूळ घातला जातोय, इथे माणूसच दिसेना झाला आहे. सगळे चोर दिसत आहेत, कोणी पैसे चोरतंय, कुणी मत चोरतंय, कुणी पक्ष चोरतंय,” अशा शब्दांत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता त्यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला.

मुंबईतील पूरस्थितीवर हल्ला

मुंबईत नवीन ठिकाणी पाणी साचत असल्याचे सांगत उद्धव ठाकरेंनी सरकारला धारेवर धरले. “विमानतळावरील पाण्याचे फोटो येत आहेत. हे विमानतळ कोणाकडे आहे? त्यामुळे आता बंदर करायची गरज नाही. जहाज पण तिथेच येतील आणि विमान पण तिथे येतील,” असे म्हणत त्यांनी अदानी समूहावरही टीका केली.

नुकसानीस सरकार जबाबदार

नांदेड जिल्ह्यातील 11 गावांचे पुनर्वसन न करताच धरणाचे काम सुरू केल्यामुळे ही नैसर्गिक नसून मानवनिर्मित आपत्ती आली आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. “यांना माणसाची कदर नाही, माणुसकी तर नाहीच आहे, यांना फक्त कॉन्ट्रॅक्टर्सचे खिसे कसे भरायचे एवढेच माहिती आहे,” असा गंभीर आरोप त्यांनी केला.

यावेळी, त्यांनी अनेक दिवसांनी हवामान वेधशाळेचा अंदाज खरा ठरल्याचा टोमणा मारला आणि आपल्या शिवसैनिकांना सुरक्षित परत जाण्याचे आवाहनही केले. विरोधी पक्षनेता अंबादास दानवे यांच्यासह अनेक नेते यावेळी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0