महाराष्ट्र

Ahilyanagar News : 19 वर्षीय ‘वेदमूर्ती’ देवव्रत रेखेचा कारनामा! – 200 वर्षांनंतर शुक्ल यजुर्वेदाचे अत्यंत कठीण ‘दंडक्रम पारायण’ पूर्ण

•अहिल्यानगरच्या मुलाचे काशीत ऐतिहासिक यश; पंतप्रधान मोदींकडून विशेष कौतुक; 2,000 मंत्रांचे एकाकी कंठस्थ पारायण

काशी/अहिल्यानगर :- उत्तर प्रदेशातील काशी (वाराणसी) येथे संस्कृत, वेद आणि शास्त्रांचा अभ्यास करण्यासाठी गेलेल्या महाराष्ट्रातील एका 19 वर्षीय युवकाने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. अहिल्यानगरचा रहिवासी असलेल्या देवव्रत महेश रेखे याने शुक्ल यजुर्वेद माध्यंदिनी शाखेचा संपूर्ण एकाकी कंठस्थ ‘दंडक्रम पारायण’ अभ्यास पूर्ण केला आहे. हा कारनामा तब्बल 200 वर्षांनंतर पहिल्यांदाच घडला आहे.

या अत्यंत कठीण पारायणाची पूर्तता केल्याबद्दल स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देवव्रत रेखे यांचे विशेष कौतुक केले आहे.

दंडक्रम पारायण म्हणजे काय?

कठिन अभ्यास: दंड कर्म पारायण हे यजुर्वेदाच्या सुमारे 2000 मंत्रांचा विशेष विधीने पाठ (पारायण) करणे असते. यात मंत्रांचे पद सरळ आणि उलटी करून वाचले जातात, ज्यामुळे हा अभ्यास खूप कठीण मानला जातो.

वेदमूर्तीची उपाधी: देवव्रत रेखे हा सांगवेद विश्वविद्यालय वाराणसीचा विद्यार्थी आहे. त्याने 50 दिवसांमध्ये दररोज सकाळी 8 ते 12 वाजेपर्यंत हे पारायण पूर्ण केले. हा अभ्यास पूर्ण केल्याबद्दल त्याला ‘वेदमूर्ती’ ही सन्मानाची उपाधी देण्यात आली आहे.

महाराष्ट्राचा वारसा

देवव्रत महेश रेखे यांचा जन्म अहिल्यानगरमधील ब्राह्मण कुटुंबात झाला असून, त्यांचे वडील चंद्रकांत रेखे हे मोठे विद्दान आहेत आणि तेच त्यांचे पहिले गुरू आहेत. देवव्रतने वयाच्या 5 व्या वर्षापासून वेद मंत्रांचे उच्चारण सुरू केले होते.

विशेष म्हणजे, दंड कर्म पारायण पूर्ण करण्याचा हा कारनामा 200 वर्षांपूर्वी महाराष्ट्रातीलच नाशिक येथील वेदमूर्ती नारायण शास्त्री यांनी केला होता. त्यांच्या नंतर आता देवव्रत रेखे याने हा गौरवशाली वारसा पुढे नेला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0