•शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आंदोलनात सहभागी होऊन राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे
मुंबई :- मुंबईत मुसळधार पाऊस कोसळत आहे. या भर पावसातही ठाकरे गटाचे हे निषेध आंदोलन सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. ठाकरे गटाच्या या निषेध आंदोलनात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे असे संपूर्ण कुटुंब सहभागी झाले आहे. त्यासोबतच शिवसेना नेते संजय राऊत, अनिल देसाई यांच्यासह हजारो शिवसैनिक निषेध आंदोलनात सहभागी झाले होते. उद्धव ठाकरे यांनी भाषणात सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मामाची उपमा देत सरकारवर हल्लाबोल केला आहे.एवढं निर्लज्ज सरकार महाराष्ट्राने कधी पाहिलं नव्हतं असेही उद्धव ठाकरे म्हणाले आहे.
बदलापूरला दोन शाळकरी मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचारानंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. आज महाविकासाआघाडीकडून मूक आंदोलन करण्यात येत आहे. राज्यभरात ठिकठिकाणी महाविकासआघाडीच्या नेत्यांनी तोंडावर काळी पट्टी बांधत निषेध आंदोलन केले आहे. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील शिवसेना भवनाजवळ निषेध आंदोलन केले. या आंदोलनावेळी उद्धव ठाकरेंनी भाषण करताना शिंदे सरकारवर जोरदार निशाणा साधला.
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काय म्हणाले?
गेल्या काही दिवसांचा मी काल घटनांचा क्रम वाचून दाखवला. रोजा काही ना काही घडत आहे. मुंबईत घडतंय, बदलापूर , सोलापूर आणि सांगलीत घडतंय. कंस मामा भाचीला न्याय कधी देतोय, कंस मामा सर्व राख्या बांधत फिरत आहेत. बहिणीवर अत्याचार होत आहे आणि निर्लज्ज राख्या बांधत आहेत. राखी बांधण्यात आडकाठी येऊ नये म्हणून आमच्या आंदोलनात आडकाठी करत आहात. एवढं निर्लज्ज सरकार महाराष्ट्राने कधी पाहिलं नव्हतं”, असा घणाघात उद्धव ठाकरेंनी केला.
उद्धव ठाकरे यांची स्वाक्षरी मोहीम
“हा महाराष्ट्र साधूसंताचा आहे. फुले शाहू शिवाजी महाराज आणि आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. ही नावे तोंडी लावायला घेत नाही. हा संस्कारीत महाराष्ट्र आहे. एका बाजूला विकृत आणि नराधम आहे. त्यावर पांघरून घालणारं विकृत सरकार आहे. त्यांच्याविरोधातील हा लढा आहे. आजपासून गावात मुख्य चौकात स्वाक्षरी घ्या. जेवढ्या स्वाक्षऱ्या गोळया करून सर्वोच्च न्यायालयाला पाठवत आहोत. बंद का करत आहोत. हे दाखवायचं आहे”, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
तुम्ही बंद केला तरी आमचा आवाज कुणीही बंद करू शकत नाही. सरकार माताभगिनींचं रक्षण करण्यास असमर्थ असेल अत्याचार करत असेल तर आम्ही आमच्या माताभगिनींचं रक्षण करायला आम्ही सज्ज आहोत. जो शक्ती कायदा आपण केला होता. तो राष्ट्रपतींकडे पाठवला आहे. त्यांनाही आवाहन करत आहोत की शक्ती कायदा धुळखात पडला आहे. त्यावरील धुळ झटका आणि तो अंमलात आणा”, असे आवाहनही उद्धव ठाकरेंनी केले.
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…
Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…
Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…
Pune Swargate Case : पुणे पोलिसांचा ऐतिहासिक तपास | अश्लील व्हिडिओची गुगल हिस्टरी आणि बसमधील…
Rohit Pawar On DGCA And Central Minster : व्हीएसआर कंपनीला वाचवण्यासाठी दिल्लीतून हालचाली? | 28…