MLA Kailas Patil dizzy in dharashiv campaign meeting : खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या प्रचारसभेत आमदार कैलास पाटील यांना चक्कर
धाराशिव :- महाराष्ट्रातील काही भागांमध्ये उष्णतेची लाट आहे. त्यामुळे काळजी घेण्याचं आवाहन केलं जात आहे. पण तरीही काही कारणास्तव दुपारच्या वेळी घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांना कडाक्याच्या उन्हातून प्रवास करावा लागतोय. अनेकांना भर उन्हात काम करावं लागतंय. विशेष म्हणजे सध्या लोकसभा निवडणुकीचं Lok Sabha Election वातावरण आहे. त्यामुळे भर उन्हात उमेदवारांची प्रचाराची रणधुमाळी सुरु आहे. पण उष्णतेच्या लाटेचा फटका लोकप्रतिनिधींनाही बसू लागला आहे. ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील MLA Kailas Patil यांना धाराशिवमध्ये प्रचारसभेत चक्कर आली. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या प्रचारसभेत आमदार कैलास पाटील यांना चक्कर आली. त्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं आहे. कैलास पाटील MLA Kailas Patil यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आमदार कैलास पाटील MLA Kailas Patil यांना उष्माघातामुळे हा त्रास झालाय. धाराशिवमध्ये खासदार ओमराजे निंबाळकर यांची सभा सुरु होती. यावेळी अचानक आमदार कैलास पाटील यांना चक्कर आली आहे. ते चक्कर येऊन जमिनीवर पडले. घटनेचं गांभीर्य ओळखून काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी तातडीने त्यांना एका गाडीतून रुग्णालयात नेलं. कैलास पाटील यांना रुग्णालयात नेत असतानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…