Uddhav Thackeray : मशाल गीतातील जय भवानी शब्द आणि इतर काही शब्दांवर निवडणूक आयोगाने आक्षेप

•कारवाई केली तरी चालेल शब्द मागे घेणार नाही…Uddhav Thackeray
मुंबई :- शिवसेना फुटी नंतर शिवसेना पक्षाचे नावाने चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवडणूक आयोगाने या गटाला दिले. तर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असे पक्षाचे नाव देऊन त्यांना मशाल हे चिन्ह दिले आहे. सध्या राज्यात आणि देशात लोकसभेच्या निवडणुका जारी करण्यात आले असून पहिल्या टप्प्यातील निवडणुका संपन्न झाले आहे. यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून मशाल असे आपले प्रचार गीत लोकसभेच्या निवडणुकीसाठी प्रसिद्ध केले. या गीतावर आता निवडणूक आयोगाने काही शब्दांवर आक्षेप घेतला आहे.
मशाल गीतावरुन निवडणूक आयोगाने त्यांना कोंडीत पकडले आहे. मशाल गीतातील जय भवानी शब्द आणि इतर काही शब्दांवर निवडणूक आयोगाने आक्षेप घेतला आहे. उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला थेट आव्हान दिले आहे. कारवाई करायची तर करा. पण आम्ही भवानी हा शब्द काढणार नाही. भवानी माता आमची अस्मिता आहे. अस्मितेशी तडजोड नाही, असा दमच त्यांनी भरला आहे. त्यामुळे आता निवडणूक आयोगाविरुद्धचा सामना रंगणार हे वेगळं सांगायला नको.
निवडणूक आयोगाचे नोटीस
आम्ही जे गीत दिलं होतं त्या गीतात त्या गाण्याचा जोश वाढतोय. कोरसला जय भवानी आणि जय शिवाजी घोषणा आहे. त्यातील जय भवानी हा शब्द काढा. हा लेखी फतवा आला आहे. आम्ही जय भवानी हा शब्द काढणार नाही. आमच्यावर कारवाई करणार असाल तर त्यांनी आधी मोदी आणि शहा यांच्यावर कारवाई करावी. मग महाराष्ट्राच्या कुलदैवताची अपमान केला असा आरोप आम्ही केला तर त्याला तुमच्यावर उत्तर आहे का, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला विचारला.तुळजा भवाई हे महाराष्ट्राचं दैवत आहे. कित्येक वर्ष जय भवानी जय शिवाजी ही घोषणा जनतेच्या हृदयात आहे. निवडणूक आयोगाला आम्ही तेव्हा हेही सा्ंगितलं होतं की उद्या भाजपला परमिशन देत असाल तर उद्या आम्ही हर हर महादेव बोललो, जय भवानी जय शिवाजी बोलल्यावर त्याला आक्षेप असता कामा नये, असे ते म्हणाले.