UBT Shivsena Loksabha Election Member List : ठाकरेंचे 17 शिल्लेदार लोकसभेच्या रिंगणात, पहिली यादी जाहीर
•मुंबईत चार उमेदवार निवडणूक लढणार, दक्षिण मुंबई अरविंद सावंत, दक्षिण मध्य मुंबई अनिल देसाई, गजानन कीर्तीकर यांचा मुलगा अमोल कीर्तीकर याला संधी
मुंबई :- काही दिवसांपासून ठाकरें गटाच्या उमेदवाराच्या चर्चा असताना अखेर आज ठाकरे गटाचे खासदार प्रवक्ते संजय राऊत यांनी 17 शिल्लेदाराची यादी जाहीर करत लोकसभेच्या रिंगणात उतरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मुंबईतील सहापैकी चार जागेवर ठाकरे गटाने दावा करत दक्षिण मुंबईकडे पुन्हा एकदा अरविंद सावंत यांच्यावर जबाबदारी दिली असून, दक्षिण मध्य मुंबई राहुल शेवाळे यांच्या विरोधात आता अनिल देसाई दिसणार आहे. तर गजानन कीर्तिकारे सिद्धगडत असून त्यांचा मुलगा अमूल कीर्तिकर हा आता ठाकरे गटाकडून खासदारकी लढावणार आहे.ईशान्य मुंबईतून संजय दिना पाटील यांना ठाकरे गटाने उमेदवारी दिली आहे. संजय दिना पाटील हे माजी खासदार आहेत. 2009 साली किरीट सोमय्या यांना पराभूत करुन ते लोकसभेमध्ये गेले होते. पण 2014 च्या लोकसभा निवडणुकीत किरीट सोमय्या यांनी त्यांना पराभूत केलं. संजय दिना पाटील पहिल्यांदा खासदार झाले, तेव्हा ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. आता ते उद्धव ठाकरे गटामध्ये आहेत. दक्षिण मुंबईतून अरविंद सावंत यांना तिसऱ्यांदा उमेदवारी मिळाली आहे. अरविंद सावंत सर्वात पहिल्यांदा 2014 साली लोकसभेवर निवडून गेले. 2014 आणि 2019 दोन्हीवेळा अरविंद सावंत यांनी काँग्रेस उमेदवार मिलिंद देवरा यांचा पराभव केला होता. आता तेच मिलिंद देवरा शिवसेना शिंदे गटात असून ते राज्यसभेवर खासदार आहेत.
मुंबईतील अन्य उमेदवार कोण?
अरविंद सावंत दोन्हीवेळा निवडून आले, तेव्हा मोदी लाट होती. पण आता अरविंद सावंत यांच्यासमोर आव्हान असेल. दक्षिण मुंबईतून भाजपाच्या राहुल नार्वेकर यांना उमेदवारी मिळेल अशी चर्चा आहे तसच मनसे महायुतीमध्ये सहभागी झाल्यास ही जागा त्यांना मिळू शकते. वायव्य मुंबईतून अमोल किर्तिकर, दक्षिण मध्य मुंबईतून अनिल देसाई आणि ठाण्यातून राजन विचारे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. आता उत्सुकता लागली आहे ती कल्याण लोकसभेच्या संदर्भातील जागेवर शिंदेचे पुत्र असलेले खासदार श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात कोणाला संधी मिळणार हे पाहणे उत्सुकताचे ठरले आहे.
खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत उमेदवार जाहीर
हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि शिवसेना पक्ष प्रमुख श्री.उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेनेच्या 17 लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर करण्यास येत आहे…मुंबई दक्षिण मध्य:अनिल देसाई यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात येत आहे.इतर 16 उमेदवार पुढील प्रमाणे:
ठाकरे गटाकडून कोणाला संधी ?
1 बुलढाणा उमेदवार
प्रा. नरेंद्र खेडेकर
2 यवतमाळ – वाशिम
संजय देशमुख
3 मावळ
संजोग वाघेरे पाटील
4 सांगली
चंद्रहार पाटील
5 हिंगोली
नागेश पाटील आष्टीकर
6 संभाजीनगर
चंद्रकांत खैरे
7 धारशीव
ओमराजे निंबाळकर
8 शिर्डी
भाऊसाहेब वाघचौरे
9 नाशिक
राजाभाऊ वाजे
10 रायगड
अनंत गीते
11 सिंधुदुर्ग – रत्नागिरी
विनायक राऊत
12 ठाणे
राजन विचारे
13 मुंबई – ईशान्य
संजय दिना पाटील
14 मुंबई – दक्षिण
अरविंद सावंत
15 मुंबई – वायव्य
अमोल कीर्तिकर
16 परभणी
संजय जाधव
17 अनिल देसाई
मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदार संघ
ठाकरे गटाकडून अधिकृतपणे 17 उमेदवार जाहीर झाल्याचे संजय राऊत यांनी घोषित केले आहे.