Pune Murder | पुण्यात एकाच रात्री दोन मर्डर : नानापेठेत आंदेकर यांच्यावर गोळीबार तर हडपसर येथे धारदार शस्त्राने खून
- पुण्यातील कायदा सुव्यवस्था परिस्थिती बिघडली
- पुण्यात गुन्हेगारांपेक्षा पोलिसांवर अंकुश जास्त?
- संगीत खुर्ची व अनुभवाला कात्री दिल्यामुळे पुण्यात गुन्हेगारी फोफावली !
पुणे, दि. २ सप्टेंबर, मुबारक जिनेरी (महाराष्ट्र मिरर) Pune Murder
पुणे शहरात एकाच रात्री दोन मर्डर (Pune Murder) झाल्याने खळबळ उडाली आहे. एरव्ही शांत असणारे पुणे आता गुन्हेगारीसाठी कुप्रसिद्ध होत आहे. नाना पेठेतील माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर गोळीबार व तीक्ष्ण हत्याराने वार करून खून झाल्याची घटना घडली असतानाच हडपसर येथे एकाचा धारदार हत्याराने वार करून खून करण्यात आला आहे. एकाच रात्री दोन मर्डर झाल्याने पुण्यातील गुन्हेगारीचे भीषण वास्तव समोर आले आहे. Pune Police
राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर Vanraj Andekar यांच्या निधनाबाबत पुण्याचे सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा म्हणाले, “आज रात्री साडेनऊच्या सुमारास वनराज आंदेकर (अजित पवार यांच्या राष्ट्रवादी गटाचे माजी नगरसेवक) त्यांच्या चुलत भावासह चौकात उभे होते. लोकांनी येऊन त्यांच्यावर हल्ला केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.गुन्हे शाखा आणि इतर झोनचे पथक आरोपी शोध घेत आहे. आरोपी कोण आहेत हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. वनराज आंदेकर यांच्यावर हल्ला का केला? यामध्ये ज्यांची नावे समोर आली आहेत, त्यांची चौकशी सुरू आहे. धारदार शस्त्राने त्याचा मृत्यू झाला.”हल्लेखोरांनी आधी माजी नगरसेवक वनराज यांच्यावर पिस्तुलाने हल्ला केला आणि नंतर गोळ्या झाडल्या. वनराज आंदेकर हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले असताना हल्लेखोर तेथून पळून गेले.
हडपसर येथे फायनान्स मॅनेजरचा खून
वनराज आंदेकर खून प्रकरण झाले असतानाच दुसरीकडे हडपसर येथे सासवड रोड वर रात्री २ च्या सुमारास वासुदेव कुलकर्णी, वय ४७, रा. उत्कर्षनगर सोसायटी, पुणे यांचा अज्ञात मारेकऱ्यांनी धारदार शास्त्राने तोंडावर वार करून खून केला आहे. पुण्यातील दोन्ही घटनांमुळे शहरात भयाण शांतता पसरली आहे.
पुण्यात गुन्हेगारांपेक्षा पोलिसांवर अंकुश जास्त?
पुणे शहरात गुन्हेगारी घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. गुन्हेगारी बोकाळली आहे. कायद्याची भीती गुन्हेगार बाळगत नसून ‘कोयत्याचा’ धाक मात्र पुणेकर बाळगत आहेत. कोयत्यासोबतच ‘घोडा’ पिस्टलचा वाढता वापर चिंतेचा विषय ठरत आहे. एकूणच गुन्हेगारांवर अंकुश राहिला नाही. तर दुसरीकडे पोलीस कर्तव्यावर असताना छोट्या-छोट्या घटनांचा कारण करून त्यांना ‘सजा’ देण्यात येत असल्याने मॉरल डाऊन झाले आहे. अशा परिस्थितीत गुन्हेगार थेट पोलिसांवर कारवाईसाठी कोर्टात धाव घेत आहेत. पुण्यातील विदारक परिस्थिती भयाण रूप घेत आहे.
संगीत खुर्ची व अनुभवाला कात्री दिल्यामुळे पुण्यात गुन्हेगारी फोफावली !
पुणे शहर हद्दीत अवैध धंदे रोखण्यासाठी व ‘ताळमेळ’ बसू नये यासाठी संगीत खुर्ची संकल्पना राबविण्यात आली. परंतु संगीत खुर्ची करत असताना गुन्हेगारी रोखण्याकडे दुर्लक्ष झाले, हि सत्य परिस्थिती आहे. अनुभवाला कात्री दिल्याने पुण्याचा अनुभव असणारे व गुन्हेगारी मोडकीस काढण्यासाठी सक्षम असणारे धडाकेबाज अधिकारी नकळत बाजूला सारले गेले. ‘डॅशिंग’ अधिकाऱ्यांच्या अभावामुळे गुन्हेगार कायद्याला धजावत नसल्याचे पुणेकर पाहत आहेत. आता तरी ‘डॅशिंग’ अधिकाऱ्यांना पाचारण करून गुन्हेगारी संपविण्यासाठी व्यापक पावले उचलली जातील अशी अपेक्षा आहे.