Tushar Ghadigaonkar News : काम नसल्याच्या नैराश्यातून अभिनेता तुषार घाडीगावकरचे टोकाचे पाऊल,‘लवंगी मिरची’ ते ‘सखा माझा पांडुरंग’ — छोट्या पण उठावदार भूमिका करणारा चेहरा हरपला
मुंबई | मराठी मालिकांमधून आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या तरुण अभिनेता तुषार घाडीगावकर Tushar Ghadigaonkar याने आत्महत्या केल्याची दु:खद घटना समोर आली आहे. गेल्या काही महिन्यांपासून कामाच्या प्रतीक्षेत असलेल्या तुषारने मानसिक नैराश्यातून हे टोकाचे पाऊल उचलले, अशी माहिती समोर आली आहे. तो मुंबईतील भांडूप येथे वास्तव्यास होता.
सामान्य चेहऱ्यातून खास व्यक्तिमत्त्व जपणारा ‘घाड्या’ अर्थात तुषार, रुपारेल महाविद्यालयात अभिनयाची सुरुवात करताना कॉलेज रंगभूमीचा उजवा कोपरा ठरला होता. ‘लवंगी मिरची’, ‘मन कस्तुरी रे’, ‘सखा माझा पांडुरंग’ अशा मालिकांमध्ये त्याने छोट्या पण परिणामकारक भूमिका साकारल्या होत्या. ‘भाऊबळी’, ‘झोंबिवली’ अशा चित्रपटांमधूनही तो प्रेक्षकांच्या मनात घर करून गेला होता.
परंतु ग्लॅमरच्या जगामागची वास्तवाची किनार पुन्हा एकदा समोर आली आहे. सततच्या नकारात्मकतेतून, आर्थिक व मानसिक दबावातून हा अभिनेता गडबडलेल्या जगाला शेवटचा निरोप देऊन निघून गेला.
तुषार मूळचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथील होता. अभिनयाची गोडी शालेय जीवनातच लागलेली. अनेक मित्रांना हसवत, जगण्याचा संघर्ष तो खंबीरपणे करत राहिला, पण अलीकडच्या काळात कामाच्या अभावाने नैराश्याने त्याच्यावर ताबा मिळवला.
या घटनेनंतर संपूर्ण मराठी कलाविश्वात हळहळ व्यक्त होत असून, अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर दुःख व्यक्त केले आहे. कलाकारांच्या मानसिक आरोग्यविषयीच्या प्रश्नांवर पुन्हा चर्चा सुरू होण्याची शक्यता आहे.
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…