ठाणे

Tushar Apte : बदलापूरचा उद्रेक अन् भाजपचा ‘बॅकफूट’! 24 तासांतच तुषार आपटेंचा राजीनामा; मनसे-शिवसेनेच्या इशाऱ्यापुढे सत्ताधारी झुकले

Chandrashekhar Bawankule On Tushar Apte : पक्षाच्या आदेशानंतर आपटेंची ‘स्वखुशीने’ माघार; चंद्रशेखर बावनकुळेंनी कारवाईचे संकेत देताच हालचालींना वेग

बदलापूर | कुळगाव-बदलापूर नगरपरिषदेत Badlapur Nagarparishad स्वीकृत नगरसेवक म्हणून निवड झाल्यापासून वादाच्या भोवऱ्यात अडकलेले तुषार आपटे यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. बदलापूर बाल लैंगिक अत्याचार प्रकरणातील सहआरोपीला नगरसेवक पद दिल्याने भाजपवर राज्यभरातून टीकेची झोड उठली होती. ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पक्षाची होणारी नाचक्की रोखण्यासाठी भाजप वरिष्ठांनी आदेश देताच, 10 जानेवारी 2026 रोजी आपटे यांनी आपला राजीनामा सादर केला.

24 तासांचा थरार आणि राजकीय दबाव

9 जानेवारी रोजी आपटे यांची निवड जाहीर झाली होती. त्यानंतर अवघ्या काही तासांतच राजकीय वातावरण तापले.

संजय राऊतांचा सवाल: “अत्याचाराबद्दल भाजपने हे बक्षीस दिले आहे का?” असा धारदार सवाल विचारत संजय राऊत यांनी भाजपला कोंडीत पकडले होते.
मनसेचा ‘महामोर्चा’ इशारा: मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी 13 जानेवारीला बदलापूरमध्ये महामोर्चा काढण्याचा आणि तीव्र आंदोलनाचा इशारा दिला होता. “हे पद रद्द झाले नाही, तर गाठ मनसेशी आहे,” या इशाऱ्याने भाजपची चिंता वाढवली होती.

बावनकुळेंचे विधान आणि आपटेंची माघार

जालना येथे माध्यमांशी बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या प्रकरणावर कडक भाष्य केले होते. “ज्यांनी चूक केली त्यांच्यावर निष्पक्षपणे कारवाई होईल,” असे संकेत त्यांनी दिले होते. बावनकुळेंच्या या विधानानंतर काही वेळातच तुषार आपटे यांनी आपला राजीनामा वरिष्ठांकडे सोपवला.

राजीनामा पत्रात काय म्हटले?

तुषार आपटे यांनी आपल्या पत्रात नमूद केले की, “माझी कुळगाव बदलापूर नगरपरिषद स्वीकृत सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. मी आज 10 जानेवारी 2026 रोजी या पदाचा स्वखुशीने राजीनामा देत आहे. कृपया तो स्वीकारावा.” जरी त्यांनी पत्रात ‘स्वखुशीने’ म्हटले असले, तरी वाढता लोकक्षोभ आणि पक्षाची झालेली बदनामी हेच या राजीनाम्यामागचे मुख्य कारण असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

2 hours ago

मुंबई पालिकेचा ‘महा’बजेट: 80,952 कोटींचा विकास आराखडा! फेरीवाल्यांना आता ‘QR कोड’चे सुरक्षा कवच, तर अनधिकृत बांगलादेशींवर कठोर कारवाई

Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…

19 hours ago

मुंबईचा ‘महा’अर्थसंकल्प: 80,952 कोटींची विकासाची झेप! राखीव निधीतून 13 हजार कोटींचा अंतर्गत डोस, निवडणुकीनंतर पालिकेचा खजिना खुला

Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…

20 hours ago