क्राईम न्यूज

Tulij Police : तुळींज पोलिसांची धडाकेबाज कामगिरी! नालासोपाऱ्यातील घरफोडीचा छडा; 48 तासांत आरोपींना सुरतमध्ये ठोकल्या बेड्या

Nalasopra Latest Murder News : पती-पत्नीने मिळून केला होता डल्ला; 2 लाख 86 हजारांचा मुद्देमाल जप्त

नालासोपारा | नालासोपारा पूर्व येथील महेश पार्क परिसरातील एका बंद घराचा कडी-कोयंडा तोडून 4 लाख 40 हजारांचा ऐवज लंपास करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला तुळींज पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे. विशेष म्हणजे, चोरी केल्यानंतर आरोपी गुजरातला पसार झाला होता, मात्र तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी सुरत गाठून आरोपी पती-पत्नीला जेरबंद केले. Nalasopra Latest Crime News

नेमकी घटना काय?

दिनांक 17 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 12.30 ते 2.30 च्या दरम्यान फिर्यादी अपर्णा संदीप शेलार यांच्या ‘नालंदा अपार्टमेंट’मधील बंद घराला चोरट्यांनी लक्ष्य केले होते. अज्ञात चोरट्याने घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला आणि कपाटातील सोन्याचे दागिने, रोख रक्कम व महत्त्वाची कागदपत्रे चोरून नेली होती. या प्रकरणी तुळींज पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 331(3), 305 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सुरतमध्ये रचला सापळा

गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस उप-आयुक्त पौर्णिमा चौगुले श्रींगी आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेने तपास सुरू केला.घटनास्थळावरील पुरावे आणि खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संतोष सुनील जाटप (वय 40 वर्षे) याचे नाव समोर आले. आरोपी सध्या सुरतमधील कामरेज भागात वास्तव्यास असल्याची माहिती मिळताच पोलीस पथकाने गुजरात गाठले. तेथून संतोषला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने आपली पत्नी गीता संतोष जाटप हिच्या मदतीने ही चोरी केल्याची कबुली दिली.

मुद्देमाल हस्तगत

पोलिसांनी 20 डिसेंबर रोजी दोन्ही आरोपींना अधिकृतपणे अटक केली. त्यांच्याकडून चोरीला गेलेल्या एकूण मालापैकी 2 लाख 86 हजार रुपये किमतीचे दागिने आणि मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. संतोष जाटप हा सराईत गुन्हेगार असून त्याने यापूर्वीही अशा प्रकारचे गुन्हे केले आहेत का, याचा तपास पोलीस करत आहेत.

या पथकाने केली कारवाई

ही यशस्वी कामगिरी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील पवार, पोलीस हवालदार अशपाक जमादार, पांडुरंग केंद्रे, दिगंबर परजने, इस्माईल शाह छपरीबन, राहुल कदम आणि अंमलदार प्रसाद पालवे, प्रकाश दवने, ज्योतीराज हांजे यांच्या पथकाने केली.

vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

39 minutes ago

मुंबई पालिकेचा ‘महा’बजेट: 80,952 कोटींचा विकास आराखडा! फेरीवाल्यांना आता ‘QR कोड’चे सुरक्षा कवच, तर अनधिकृत बांगलादेशींवर कठोर कारवाई

Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…

18 hours ago

मुंबईचा ‘महा’अर्थसंकल्प: 80,952 कोटींची विकासाची झेप! राखीव निधीतून 13 हजार कोटींचा अंतर्गत डोस, निवडणुकीनंतर पालिकेचा खजिना खुला

Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…

18 hours ago