मुंबई
Trending

Operation Sindoor ऑपरेशन सिंदूर”वर गर्जला एनडीए – शौर्य, राष्ट्रनिष्ठा आणि मोदींच्या नेतृत्त्वाचा जल्लोष!

Operation Sindoor : सीमेवर पराक्रम, दिल्लीत ठराव – एनडीएच्या बैठकीत ‘ऑपरेशन सिंदूर’चा जयघोष!

ANI :- राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए)च्या मुख्यमंत्र्यांची महत्त्वपूर्ण बैठक रविवारी (25 मे) दिल्ली येथे पार पडली. या बैठकीत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे CM Eknath Shinde यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’च्या Operation Sindoor ऐतिहासिक यशाबाबत एक ठराव मांडला. या ठरावात भारताच्या सशस्त्र दलांच्या पराक्रमाचे तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धाडसी व निर्णायक नेतृत्वाचे विशेष कौतुक करण्यात आले. या प्रस्तावाला उपस्थित सर्व घटक पक्षांनी एकमुखी पाठिंबा दिला.

‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे भारतीय सैन्याने दाखवलेले धैर्य, युद्धकौशल्य आणि देशभक्तीचा सर्वोच्च आदर्श जगासमोर ठेवण्यात आला आहे. सीमापार दहशतवाद्यांना दिलेला खणखणीत संदेश आणि भारताच्या सार्वभौमत्वाच्या रक्षणासाठी घेतलेली कडक भूमिका, एनडीए सरकारच्या सुरक्षाविषयक कटिबद्धतेचे द्योतक मानले जात आहे.

दिल्लीतील मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत शिंदेंचा महत्त्वपूर्ण ठराव मंजूर

शिंदे म्हणाले, “हे केवळ लष्करी अभियान नव्हते, तर भारताच्या राष्ट्रीय इच्छाशक्तीचे प्रतिक होते. मोदींच्या नेतृत्वाखाली भारत कोणत्याही आव्हानाला निर्भयपणे सामोरे जात आहे. आज जगाला स्पष्ट संदेश देण्याची गरज आहे— जो भारताशी टक्कर घेईल, त्याचे नावो निशाण उडवले जाईल.”

या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अध्यक्षता केली. त्यांच्यासोबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा तसेच एनडीए शासित राज्यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व घटक पक्षांचे प्रमुख उपस्थित होते.

एनडीएच्या या प्रस्तावामध्ये ‘वन रँक वन पेन्शन’, स्वदेशी संरक्षण उत्पादन, सीमावर्ती भागातील पायाभूत सुविधा विकास व आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे लष्कर सशक्त करण्याच्या पावलांचा विशेष उल्लेख करण्यात आला आहे. हे प्रस्ताव एनडीएच्या राष्ट्रीय सुरक्षेविषयी असलेल्या दृढ निष्ठेचे प्रतीक म्हणून पाहिले जात आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0