मुंबई

26/11 हल्ल्यातील शहिदांना ‘गेटवे ऑफ इंडिया’ येथे आदरांजली!

•मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्र्यांकडून शूर पोलिसांना आणि निष्पाप नागरिकांना पुष्पांजली!

मुंबई :- मुंबईवरील 26/11 दहशतवादी हल्ल्याच्या 17 व्या वर्षपूर्तीनिमित्त आज (बुधवार, 26 नोव्हेंबर) गेटवे ऑफ इंडिया येथे श्रद्धांजली कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या हल्ल्यात प्राण गमावलेल्या निष्पाप नागरिकांना आणि देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या शूर पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे स्मरण करण्यात आले.

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः या कार्यक्रमाला उपस्थित राहून हल्ल्यात जीव गमावलेल्यांना नमन केले. त्यांच्यासोबत राज्यमंत्री आशीष शेलार आणि मंगल प्रभात लोढा यांनीही शहिदांच्या स्मृतीस पुष्पांजली अर्पण केली.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी आणि नागरिकांनी मौन पाळून शूरवीरांना आदरांजली वाहिली. 26/11 च्या हल्ल्यात मुंबईने दाखवलेल्या अदम्य साहस आणि एकजुटीचे स्मरण करून हल्ल्यातील पीडितांप्रति सहानुभूती व्यक्त करण्यात आली.

vivek

Recent Posts