Train Coach Derailed : मोठा अपघात टळला, मालगाडीचे चार डबे रुळावरून घसरले, रेल्वे अधिकारी घटनास्थळी उपस्थित
•Train Coach Derailed Near Boisar Railway Station बोईसर रेल्वे स्थानकाजवळ मालगाडीचे चार डबे रुळावरून घसरले आहेत. माहिती मिळताच रेल्वेचे अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले आहेत.
ANI :- पालघरमधील बोईसर रेल्वे स्थानकाजवळ मालगाडीचे चार डबे रुळावरुन घसरले. रेल्वे अधिकारी घटनास्थळी उपस्थित आहेत. रुळावरून घसरल्याने लोकल गाड्यांवर कोणताही परिणाम झाला नसून त्या वेळेवर धावत आहेत. पश्चिम रेल्वेच्या सीपीआरओने ही माहिती दिली आहे.
सध्या रुळावरून घसरलेल्या मालगाडीचे डबे हटवण्याचे काम सुरू आहे. मालगाडी रुळावरून कशी घसरली याचाही तपास रेल्वे करत आहे. घटनेची माहिती मिळताच रेल्वे अधिकाऱ्यांनी घटनास्थळ गाठून आवश्यक ती पावले उचलली.
गेल्या आठवडाभरात देशाच्या विविध भागात प्रवासी आणि मालगाड्या रुळावरून घसरल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. या घटना पाहता रेल्वेने या बजेटमध्ये प्रवासी आणि वस्तूंच्या सुरक्षेसाठी मोठी रक्कम खर्च करण्याचे नियोजन केले आहे. विशेषत: रेल्वे अपघाताच्या घटना रोखण्यासाठी ‘कवच’ प्रणाली देशभरातील सर्व रेल्वे मार्गांवर विस्तारित करण्यात येत आहे. याशिवाय रेल्वेने पायाभूत सुविधांच्या विकासासाठीही मोठा आराखडा तयार केला आहे.