•Mumbai Tilak Vidyalaya Bomb Spot Threat आरडीएक्सने शाळा उडवण्याची धमकी, बॉम्ब शोधक पथकाची तपासणी, कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही
मुंबई | मुंबईतील धमकी ई-मेल प्रकरणांत आणखी एका शाळेची भर पडली आहे. विलेपार्ले परिसरातील टिळक विद्यालयाच्या ई-मेल आयडीवर बुधवारी पहाटे साडेचारच्या सुमारास एक धमकीचा मेल प्राप्त झाला. या मेलमध्ये शाळा आरडीएक्सने उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती.
हा प्रकार शाळेतील कर्मचाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने सुरक्षा यंत्रणांना याबाबत माहिती दिली. मुख्य सुरक्षा अधिकारी संजय तोणपी यांनी मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून घटनास्थळी पोलिस, बॉम्ब शोधक व नाशक पथकाला पाचारण केले. शाळेची कसून तपासणी करण्यात आली, मात्र कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
या घटनेपूर्वीही गोवंडी व कांदिवली येथील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना अशाच प्रकारचे बॉम्बस्फोट घडवून आणण्याचे मेल आले होते. त्यामुळे शाळांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. नाखिरान डॉट गोपाळ नावाच्या ई-मेल आयडीवरून ही धमकी आल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी मेलचा स्त्रोत शोधण्यासाठी सायबर तांत्रिक तपास सुरू केला आहे.
हा प्रकार खोडसाळपणाचा असण्याची शक्यता असून, पालक व विद्यार्थ्यांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. मुंबई पोलिस यंत्रणा सतर्क असून, अशा प्रकारांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…