Mumbai Crime News : बलात्कार, जबरी चोरी आणि खंडणीच्या गुन्ह्यातील आरोपीला 1 वर्षाची शिक्षा

•शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात मुंबई सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल
मुंबई :- संघटित गुन्हेगारी आणि गंभीर आरोप असलेल्या एका आरोपीला मुंबईतील अतिरिक्त सत्र न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. पूर्व प्रादेशिक विभागातील परिमंडळ-6 मधील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्यात आरोपी नामे किताब अली मो. सत्तार शेख याला दोषी ठरवून 1 वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
या आरोपीविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाणे गुन्ह्याची नोंद नुसार IPC कलम 377, 394, 387, 452, 325, 504,506 (2), महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37 (अ) (1), 135,142 आणि भारतीय हत्यार कायदा कलम 4,25 अन्वये गुन्हा दाखल होता.
शिवाजीनगर पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी
सोमवार (03 नोव्हेंबर ) रोजी अतिरिक्त सत्र न्यायालय, मुंबई यांनी आरोपीविरुद्ध सबळ पुरावा प्राप्त झाल्याने हा निकाल दिला.
उल्लेखनीय कामगिरी अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग (अतिरिक्त कार्यभार), विक्रम देशमाने, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-6, समीर शेख, सहाय्यक पोलीस आयुक्त, देवनार विभाग, आबुराव सोनावणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनघा सातवसे यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक (गुन्हे) पवार, तपासी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक खेबुडे, पैरवी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक ठाकुर, पोलीस हवालदार चौगुले, चव्हाण, सावंत, पोलीस शिपाई सावंत, महिला पोलीस शिपाई बाटे, जुनघरे यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.
शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दाखल असलेल्या अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये आरोपीला शिक्षा मिळाल्याने गुन्हेगारांवर वचक बसण्यास मदत होईल.


