“The Shocking Attempt to Kill Lives in Ulhasnagar”

उल्हासनगर मध्ये जीवघेणा हल्ला , लाइटर घेण्यावरून वाद, डोक्यावर गंभीर हल्ला
•उल्हासनगर मध्ये अतिशय शुल्लक कारणावरून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न
उल्हासनगर :- मध्यवर्ती पोलीस ठाणे उल्हासनगर या अतिशय शुल्लक घटनेवरून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न झाल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये सिगारेटचे लाइटर मागितले यावरून दोन आरोपींनी एकाला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे. आरोपींनी ज्याच्या सोबत वाद झाला आहे त्याच्या डोक्यावर चाकूने वार करून त्याला गंभीरित्या जखमी केले आहे.
नेमकं काय घडले?
01 जुन 2024 रोजी रात्री 08.30 वा.चे सुमारास फिर्यादी दुंबया निलया पुजारी, (71 वर्ष) व्यवसाय- पानटपरी, रा.कल्याण पुर्व यांचे पानटपरी वर संतोष रामदास महाजन, (35 वर्ष), (रा.उल्हासनगर-3) हे सिगारेट घेण्यासाठी आले असता, लायटर घेण्यावरून आरोपी 1) सोनु सोबत वाद झाल्याचा राग मनात धरून आरोपी याने त्याचा मित्र 2) विकी शिंदे यास बोलावुन आपसात संगणमत करून जिवे ठार मारण्याच्या उददेशाने सोबत आणलेल्या चाकुने संतोष रामदास महाजन यांचे डोक्यावर, पोटात व पाठीवर मारून त्यांना गंभीर जखमी केले आहे. या प्रकाराबाबत फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपीविरूध्द गुन्हा भा.द.वि कलम भा.दं.वि. कलम 307,506 (2), सह म.पो.का कलम 37(1), 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन, गुन्हयाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष पानसरे हे करीत आहेत.