Navi Mumbai News : “वाशी समाचार” वृत्तपत्राचा दुसरा वर्धापन दिन सोहळा उत्साहात संपन्न
नवी मुंबई मधील पत्रकारांचा विशेष सन्मान
नवी मुंबई : दिनांक १५ जुलै २०२४ रोजी सीबीडी बेलापूर येथील द पार्क हॉटेल मध्ये “वाशी समाचार” साप्ताहिक वृत्तपत्राचा दुसरा वर्धापन दिन सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. नवी मुंबई मधील पत्रकारांसाठी विशेष सन्मान कार्यक्रमाचे आयोजन यावेळी करण्यात आले होते. Navi Mumbai News
या कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून नवी मुंबई पोलीस उप आयुक्त (परि.१) पंकज डहाणे, कोकण विभागाचे माहिती उपसंचालक डॉक्टर गणेश मुळे, प्रभारी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी (नवी मुंबई) सुरेंद्र निकम, वाशी टाइम्सचे मुख्य संपादक व्ही.के.एन. नायर व द पार्क हॉटेलचे महाव्यवस्थापक राहुल मखिजा आदी मान्यवर उपस्थित होते. Navi Mumbai News
कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी मान्यवर पाहुण्यांच्या शुभहस्ते पत्रकारांचा विशेष सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने वृत्तपत्रांचे संपादक तसेच जेष्ठ आणि श्रेष्ठ पत्रकार उपस्थित होते. Navi Mumbai News