•7 फेब्रुवारीला उमेदवारी अर्जांची धावपळ; संख्याबळ नसतानाही ठाकरे गटाची उमेदवार उतरवण्याची तयारी, महायुतीची धाकधूक वाढली
मुंबई | देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका असलेल्या मुंबई महापालिकेच्या महापौर (BMC Mayor 2026) आणि उपमहापौरपदाच्या निवडणुकीचा अधिकृत कार्यक्रम अखेर जाहीर झाला आहे. येत्या 11 फेब्रुवारी रोजी मुंबईला नवा महापौर मिळणार असून, या पदासाठीची निवडणूक प्रक्रिया 7 फेब्रुवारीपासून खऱ्या अर्थाने सुरू होणार आहे. विशेष म्हणजे, भाजपकडे सर्वाधिक जागा असूनही शिवसेना (ठाकरे गट) या निवडणुकीत आपला उमेदवार उतरवण्याच्या तयारीत असल्याने मुंबईच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
निवडणुकीचे महत्त्वपूर्ण टप्पे
7 फेब्रुवारी: महापौर आणि उपमहापौरपदासाठी उमेदवारी अर्ज स्वीकारले जातील.
11 फेब्रुवारी (दुपारी 12 वाजता): पालिका मुख्यालयात विशेष सभेचे आयोजन.
अर्ज माघार: सभा सुरू होण्याच्या 15 मिनिटे आधीपर्यंत उमेदवारांना अर्ज मागे घेता येईल.
निकाल: त्याच दिवशी मतदानानंतर मुंबईच्या 78 व्या महापौरांची घोषणा केली जाईल.
‘मातोश्री’वर हालचालींना वेग
मुंबई महापालिकेत सध्या भाजपचे 89 आणि शिंदे गटाचे 29 असे मिळून महायुतीचे स्पष्ट बहुमत (118 जागा) दिसत आहे. मात्र, ठाकरे गटाने (65 जागा) हार न मानता महापौर आणि उपमहापौरपदासाठी उमेदवार देण्याचा विचार सुरू केला आहे. या पार्श्वभूमीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी माजी महापौर किशोरी पेडणेकर आणि अनुभवी नगरसेवकांची ‘मातोश्री’वर महत्त्वाची बैठक बोलावली आहे. संख्याबळ नसतानाही केवळ विरोधासाठी की ‘मॅजिक फिगर’ गाठण्यासाठी हा उमेदवार दिला जातोय, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महिला राज आणि आरक्षणाचे समीकरण
यंदाचे मुंबईचे महापौरपद ‘सर्वसाधारण महिला’ प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे. भाजपमधून राजश्री शिरवाडकर आणि रितू तावडे यांची नावे चर्चेत आहेत, तर शिंदे गटाकडून उपमहापौरपदासाठी यामिनी जाधव किंवा तृष्णा विश्वासराव यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. ठाकरे गटाकडून उमेदवार दिला गेल्यास ही निवडणूक चुरशीची ठरू शकते.
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…