•सायबर पोलिसांची कामगिरी ; फसवणुकीतील 7 लाख 20 हजार परत मिळवून देण्यास यश
विरार:– Telegram channel सायबर विभागाकडून ऑनलाइन फसवणुकीबाबत सातत्याने जनजागृती केली जात असतानाही विरारमध्ये पुन्हा एक सायबर फसवणुकीची घटनासमोर आली आहे. मीरा-भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या सायबर विभागाने उत्कृष्ट कामगिरी करत फसवणुकीतील 11 लाख 60 हजार रुपयांपैकी 7 लाख 20 हजार रुपये परत मिळवून देण्यास पोलिसांना यश आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून मीरा-भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या विरार पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या गुरव यांना टेलिग्राम चैनल वरून इन्व्हेस्टमेंट ॲप मध्ये गुंतवणूक केल्यास अधिकचा परतावा मिळेल अशी जाहिरात पाहिली होती. गुरव यांनी कोणत्याही प्रकारे त्या जाहिरातीची सत्यता पडताळणी न करता त्या ॲपमध्ये तब्बल 11 लाख 60 हजार रुपये गुंतवणूक केले होती. आपली फसवणूक झाली आहे असे लक्षात येतात गुरव यांनी सायबर विभागाला तक्रार दाखल केली होती. सायबर विभागाने गुरव यांनी केलेल्या ऑनलाईन व्यवहारा संदर्भातील सर्व रक्कम गोठविली. त्यानंतर संबंधित बँक आणि मर्चंट यांच्याशी व्यवहार करून न्यायालयांच्याकडून संबंध बँकेला वारंवार पत्रव्यवहार करण्यात आले होते. सायबर विभागाच्या पोलिसांनी केलेली कामगिरीमुळे तक्रारदार यांच्या फसवणूक झालेल्या रकमेपैकी 7 लाख 20 हजार रुपये मूळ खात्यात परत देण्यात पोलिसांना यश आले आहे.
पोलीस पथक
अविनाश अंबुरे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), मदन बल्लाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे), मि.भा.व.वि.पोलीस आयुक्तालय यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुजितकुमार गुंजकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील वाव्हळ, पोलीस उपनिरीक्षक प्रसाद शेनोळकर, पोलीस अंमलदार ओंकार डोंगरे, महिला पोलीस अंमलदार पल्लवी निकम, महिला पोलीस अंमलदार स्नेहल पुणे यांनी पार पाडली आहे
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…