मुंबई
Trending

Sanjay Raut : मुख्यमंत्री फडणवीसांवर संजय राऊत यांचा घणाघात! “हनी ट्रॅपचे दूध का दूध, पाणी का पाणी करा”

Sanjay Raut On Honey Trap : जळगावमधील लोढा-महाजन फोटोवरून सीबीआय चौकशीची मागणी

मुंबई :- राज्यात गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा विषय ठरलेल्या हनी ट्रॅप प्रकरणावरून आता राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. “राज्यात हनी ट्रॅप नाही” असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला असला तरी, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी थेट मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर आरोपांचा भडिमार केला आहे.

आज (21 जुलै) संजय राऊत यांनी जळगावच्या प्रफुल्ल लोढा आणि मंत्री गिरीश महाजन यांचा फोटो ट्विट करत मुख्यमंत्री फडणवीस यांना थेट खुलं आव्हान दिलं आहे. “या एका फोटोची CBI चौकशी करा, दूध का दूध, पाणी का पाणी होईल!” असा ठाम शब्दांत त्यांनी सवाल केला आहे.

पत्रकार परिषदेत त्यांनी पुढे सांगितले की, “हे सरकार महाराष्ट्राला कलंकित करत आहे. बारमध्ये बारबाला सापडत आहेत, आमदार निवासात मारामाऱ्या होतात आणि विरोधकांवर हनी ट्रॅप लावले जात आहेत. चार मंत्र्यांना हनी ट्रॅपमध्ये अडकवलं गेलं असून त्यातील दोन भाजपचे आहेत,” असा गंभीर आरोप त्यांनी केला.

संजय राऊत यांचा दावा आहे की, प्रफुल लोढा हनी ट्रॅपद्वारे भाजपसाठी अनेक महत्त्वाच्या व्यक्तींना जाळ्यात ओढत होता. “हा माणूस केवळ भाजपचा हस्तक नाही, तर विरोधकांनाही जेरबंद करणारा एक माध्यम होता. पण आता त्याच्याच जाळ्यात भाजपचे लोक सापडले आहेत,” असे म्हणत त्यांनी फडणवीसांवर नैतिकतेचा सवाल उपस्थित केला.

“पेन ड्राइव्ह आणि सीडी लपवण्यासाठी पोलिसांची धावपळ सुरू आहे,” असा दावा करत त्यांनी सांगितलं की, लोढा प्रकरणाची सूत्र जामनेर, जळगाव, नाशिक, मुंबई ते थेट दिल्लीपर्यंत हलली आहेत.शेवटी त्यांनी टोला लगावला की, “भाजपची वॉशिंग मशीन सर्व डाग धुत नाही, हा एक डाग आता उघड झालाय!”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0