विधान परिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक आयोगाकडून कार्यक्रम जाहीर
Maharashtra legislative council election : विधान परिषदेच्या 11 आमदारांचा कार्यकाळ 27 जुलैला संपत आहे, निवडणूक आयोगाकडून कार्यक्रम जाहीर
मुंबई :- लोकसभेच्या धुराळ्यानंतर आता राज्यात विधानसभेच्या निवडणुका येत्या सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तत्पूर्वी विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षण मंडळाच्या चार जागे करिता 26 तारखेला मतदान होणार आहे. हा कार्यक्रम संयुक्त होताच पुन्हा एकदा विधान परिषदेच्या 11 आमदारांचा कालावधी 27 जुलैला समाप्त होणार आहे. तत्पूर्वी निवडणूक आयोगाने 11 उमेदवारांकरिता विधान परिषदेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.राज्यात विधानसभेत 288 सदस्य आहेत. तर विधान परिषदेतील सदस्य संख्या 78 इतकी आहे. Maharashtra legislative council election News
विधान परिषद निवडणुकीचा असा असेल कार्यक्रम…
- 25 जून रोजी अधिसूचना जारी केली जाणार आहे.
- 2 जुलै अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख असेल.
- 3 जुलै अर्ज छाननी
- 5 जुलै अर्ज मागे घेण्याची मुदत
- 12 जुलै रोजी सकाळी 9 ते दुपारी 4 या वेळेत मतदान होईल.
- 12 जुलै रोजी सायंकाळी पाच वाजता मतमोजणी होऊन निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.
विधान परिषदेच्या या आमदारांचा कार्यकाळ संपला
- मनीषा कायंदे (शिवसेना, शिंदे गट)
- भाई गिरकर (भाजप)
- नीलय नाईक राष्ट्रवादी
- (अजित पवार गट)
- बाबाजानी दुरानी (राष्ट्रवादी अजित पवार गट)
- अनिल परब (शिवसेना, ठाकरे गट)
- रमेश पाटील (भाजप)
- वजहत मिर्झा (काँग्रेस)
- रामराव पाटील (भाजप)
- प्रज्ञा सावंत (काँग्रेस)
- महादेव जानकर (रासप)
- जयंत पाटील (शेकाप) या आमदारांच्या जागा आता रिक्त होणार आहेत.
महाराष्ट्र विधान परिषदेचे एकूण 78 सदस्य आहेत. त्यातील 30 सदस्य विधानसभा सदस्यांमार्फत निवडले जातात. 22 सदस्य विविध स्थानिक प्राधिकारी संस्थांमार्फत निवडले जातात. तसंच 7 सदस्य पदवीधर मतदारसंघांमधून तर 7 सदस्य शिक्षक मतदारसंघांमधून निर्वाचित होत असतात.याव्यतिरिक्त 12 सदस्य हे राज्यपालांद्वारे नामनियुक्त केले जातात. वाडःमय, शास्त्र, कला, सहकारी चळवळ आणि समाजसेवा यामध्ये विशेष ज्ञान किंवा व्यावहारिक अनुभव असलेल्या व्यक्तींनाच राज्यपालांकडून विधानपरिषदेवर नामनिर्देशित केले जाते. Maharashtra legislative council election News