मुंबई

The Burning Car : “द बर्निंग कार”, मुंबई-पुणे महामार्गावर कारला अचानक लागली आग

•मुंबई पुणे महामार्गावरून प्रवास करणाऱ्या एका कारला अचानक आग लागल्याने महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली, अचानक लागलेल्या आग मध्ये कोणतीही हानी नाही चालक आणि सहप्रवासी सुखरूप

पनवेल :- मुंबई पुणे महामार्गावर बुधवारी रात्री 11.30 सुमारास कारण अचानक पेट घेतल्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती. शेवरलेट कंपनीची जितो कार ला मुंबई पुणे महामार्गावरील पुणे मध्ये असताना अचानक आग लागली. सुदैवाने या कारमधील चालक आणि सहप्रवासी यांना कोणतेही अपत्यजन्य परिस्थिती निर्माण झाली नाही. मुंबई ते बेंगलोरला जात असताना ही घटना घडल्याचे सांगितले आहे.

हरी ओम मिश्रा (23 वर्ष), रणवीर सिंग (22 वर्ष) हे दोघेजण या कारणे प्रवास करत होते चालक आणि सहप्रवाशी सुखरूपासून संपूर्ण कार जळाली आहे. कळंबोली फायर ब्रिगेड आणि आय आर बी फायर ब्रिगेड यांच्या मदतीने आग विझवण्यात आली आहे. पोलीस उपनिरीक्षक नाईक, पोलीस हवालदार पाटील खंडेश्वर पोलीस ठाणे, तसेच आय आर बी फायर ब्रिगेड, मुंबई फायर ब्रिगेड यांच्या उपस्थितीत ही आग आटोक्यात आणून सदर कारबाबत पंचनामा पोलिसांनी तयार केला आहे.

vivek

Recent Posts