Vidhan Parishad : विधान परिषदेच्या निवडणुकीचे बिबुल वाजले
•Vidhan Parishad विधान परिषदेच्या सहा जागांवर निवडणुका जाहीर
मुंबई :- विधान परिषदेच्या Vidhan Parishad चार जागांकरिता निवडणुका जाहीर करण्यात आले आहे. सध्या राज्यात देशात लोकसभेच्या निवडणुकी चालू असून महाराष्ट्र विधान परिषदेचे चार जागांकरिता निवडणूक जाहीर करण्यात आले आहे. विधान परिषदेच्या चार सदस्यांचा 07 जुलै रोजी कार्यकाल समाप्त होणार असून त्यापूर्वीच विधान परिषदेच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. या निवडणुकीमध्ये दोन पदवीधर आणि दोन शिक्षण मतदार संघाचा समावेश आहे
10 जून रोजी मुंबई पदवीधर मतदार संघ, मुंबई शिक्षण मतदारसंघात असेच कोकण पदवीधर मतदारसंघ आणि नाशिक शिक्षण मतदारसंघासाठी निवडणूक होणार आहे. त्यासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आले आहे. या कार्यक्रमात 15 मे रोजी चार जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होणार असून 22 मे उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. 24 मे पर्यंत उमेदवारी अर्ज छाननी केली जाणार आहे त्याची 27 मे पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख आहे. 10 जूनला मतदान होणार असून सकाळी आठ ते दुपारी चार वाजेपर्यंत मतदान होणार आहे तर 13 जुन रोजी मतमोजणी होणार असल्याचे निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आले आहे. Vidhan Parishad
कोण-कोणत्या विधान परिषदेच्या आमदारांचा कार्यकाल संपत आहे
7 जुलै 2024 रोजी, मुंबई पदवीधर मतदारसंघाचे आमदार विलास पोटनिस, कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे, नाशिक शिक्षक मतदारसंघाचे आमदार दराडे भिकाजी तसेच मुंबई शिक्षक मतदारसंघाचे आमदार कपील पाटील यांचा कार्यकाळ संपणार आहे. त्यामुळे या चार जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.