क्राईम न्यूजठाणेमुंबई
Trending

Thane Wagle Robbery News : गर्दीचा फायदा घेत प्रवाशांचे दागिने चोरणारी टोळी गजाआड, वागळे इस्टेट पोलिसांची कारवाई

ठाणे :- गर्दीचा फायदा घेत प्रवाशांच्या खिशातले पाकीट आणि सोन्याचे दागिने हातचलाखीने चोरणाऱ्या दोन सराईत चोरट्यांना वागळे इस्टेट पोलिसांनी Thane Wagle Estate Police Station बेड्या ठोकल्या आहेत. अन्सारी अतीक अहमद मोहम्मद सुबराती (55 वय ) आणि शेख कलीम शेख जमील (43 वय) अशी या दोन सराईत चोरट्यांची नावे आहेत. हे दोघे नाशिकच्या मालेगाव परिसरात राहणारे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वागळे इस्टेट पोलिसांच्या हद्दीत घडलेल्या 303 (2),3(5) प्रमाणे दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपींना शोधण्यासाठी गुन्हे शाखा कक्ष-5 वागळे ठाणे यांच्याकडून कारवाई करत असताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक सलील भोसले यांना मिळालेल्या माहितीनुसार पाकीट चोरी करणारे सिद्धेश्वर तलाव बस स्टॉप समोर नाशिक मुंबई महामार्गावर येणार असल्याची माहिती मिळाली होती. पोलीस उपनिरीक्षक सुनील अहिरे आणि त्यांच्या पथकाने सदर ठिकाणी सापळा रचून या दोन सराईत गुन्हेगारांना ताब्यात घेतले त्यांचे अंग झडती घेतली असता त्यांच्याकडे 7500 चे रोख रक्कम आणि 98 हजार 610 किमतीचे सोन्याचे दागिने असा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. आरोपींच्या विरोधात श्रीनगर पोलीस ठाणे आणि आझाद मैदान पोलीस ठाणे येथे दोन गुन्हे दाखल असल्याचे आरोपींनी कबूल केले आहे. आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असून ते गर्दीचा फायदा घेऊन प्रवाशांच्या खिशात हात घालून पाकीट आणि सोन्याचे दागिने लंपास करणारी टोळी असल्याचे स्पष्ट झाले आहे.

पोलीस पथक

अमरसिंह जाधव, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), शेखर बागडे, सहाय्यक पोलीस आयुक्त शोध-1 (गुन्हे) यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा घटक-5 वागळे ठाणे चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सलील भोसले, सहा पोलीस निरीक्षक शरद पाटील, पोलीस उपनिरीक्षक सुनिल अहिरे, पोलीस हवालदार पालांडे, काटकर, तारी, शिंदे, निकम, पोलीस नाईक बंडगर, ठाणेकर, पोलीस शिपाई शिकारे, यश यादव या पथकाने केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0