मुंबई

Thane Upvas News : उपवन तलावात १० वर्षीय मुलाचा दुर्दैवी बुडून मृत्यू

ठाणे : उपवन तलाव, पाळाई देवी मंदिराजवळ एका १० वर्षीय मुलाचा पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी दुपारी घडली. मृत मुलाचे नाव कु. राज भास्कर चाबूकस्वार (वय १० वर्षे, राहणार – पाईपलाईन, भीमनगर, वर्तकनगर, ठाणे) असे आहे. Thane Upavan Latest News

मिळालेल्या माहितीनुसार, तीन मुले उपवन तलावाच्या काठावर फिरण्यासाठी गेली असता त्यातील राज तलावात पोहण्यासाठी उतरला. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने तो खोल पाण्यात गेला आणि बुडाला.

घटनेची माहिती मिळताच वर्तकनगर पोलीस, ठाणे महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन पथक, ठाणे आपत्ती प्रतिसाद दल (TDRF), अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. संयुक्त बचावकार्यातून राजला तलावातून बाहेर काढण्यात आले. त्यानंतर रुग्णवाहिकेतून जिल्हा शासकीय रुग्णालय, ठाणे येथे नेण्यात आले. मात्र तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, वर्तकनगर पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे

vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

33 minutes ago

मुंबई पालिकेचा ‘महा’बजेट: 80,952 कोटींचा विकास आराखडा! फेरीवाल्यांना आता ‘QR कोड’चे सुरक्षा कवच, तर अनधिकृत बांगलादेशींवर कठोर कारवाई

Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…

18 hours ago

मुंबईचा ‘महा’अर्थसंकल्प: 80,952 कोटींची विकासाची झेप! राखीव निधीतून 13 हजार कोटींचा अंतर्गत डोस, निवडणुकीनंतर पालिकेचा खजिना खुला

Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…

18 hours ago