•वंदना माने आपल्या पतीसोबत यशोधन नगर येथून मॉर्निंग वॉकसाठी रस्त्याने पायी जाताना मोटार सायकलवरुन आलेल्या दोघांनी त्यांच्या गळयातील सोन्याची साखळी ओढून पळ काढला.
ठाणे :- महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या हिसकावून पळ काढत चोऱ्या करणारे टोळीतील 2 जणांना पोलिसांच्या स्थानिक गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने अटक केली. त्यामध्ये एक आरोपी हा इराणी असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे.14 गुन्हे पोलिसांनी उघडकीस आणले आहेत.त्यांच्याकडून 3 लाख 90 हजार 240 रुपयांचे 6 तोळे सोने मंगळसूत्र आणि चैन हस्तगत करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार वाघचवरे यांनी दिली.
वंदना प्रकाश माने (56 वय) ठाणे येथील गणेश अपार्टमेंट यशोधन नगर ठाणे पश्चिम येथून पतीसोबत 12 मार्च च्या दरम्यान सकाळी 06.00वा.च्या सुमारास यशोधन नगर येथील भारत सहकारी बँक च्या जवळ मॉर्निंग वॉक करीत असताना मोटार सायकलवरुन आलेल्या दोघांनी त्यांच्या गळयातील सोन्याची साखळी ओढून पळ काढला. याबाबत वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. वर्तक नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार वाघचवरे यांनी वर्तक नगर गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल चिंतामण आणि प्रकटीकरण यांचे पथक नियुक्त केले होते.शहरातील सीसीटीव्ही फुटेज व तांत्रीक विश्लेषणाच्या आधारे तपास करत असताना पथकास हा गुन्हा संशयित जाफर युसुफ जाफरी उर्फ चव्हाण (26 वय,रा. आंबिवली, कल्याण वेस्ट) आणि त्याच्या साथीदार संदीप गिरीषचंद्र प्रसाद (20 वय,रा. अटाली आंबिवली) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी आरोपीचे सखोल चौकशी केली असता आरोपीने गुन्हा केल्याचे कबूल केले असून अशाच पध्दतीने 14 महिलांच्या गळयातील सोन्याचे दागीने चोरी केल्याची कबुली दोघांनी दिल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाघचवरे यांनी सांगितले. पोलिसांनी आरोपींच्या ताब्यात तीन लाख 90 हजार 240 रुपये किमतीचे सहा तोळ्याचे सोन्याचे दागिने, एक लाख वीस हजार रुपयांची दोन मोटरसायकल आणि पंधरा हजार रुपये किमतीचे मोबाईल फोन असा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.
पोलीस पथक
पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे पोलीस सह आयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण, अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग विनायक देशमुख,प्रशांत कदम, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-5 व सहाय्यक पोलीस आयुक्त वर्तकनगर विभाग मंदार जावळे, यांचे मार्गदर्शनाखाली, तसेच वर्तकनगर पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार वाघचवरे यांचे सुचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक (गुन्हे) मल्हारी कोकरे, तपास पथकाचे पोलीस उप निरीक्षक विठ्ठल चिंतामण, पोलीस हवालदार जाधव, राठोड, पोलीस शिपाई पाटोळे, सौदागरे, नागरे, कात्राबाद, पवार, काळे,राठोड यांनी केली आहे.
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…