Thane Tadipar News: तडीपार आरोपीच्या आवळल्या मुस्क्या, टिल्या पोलिसांच्या ताब्यात
Thane Tadipar News : पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी दिले तडीपारचे आदेश, तडीपार आरोपीकडे बेकायदेशीर गावठी कट्टा
ठाणे :-पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे (Thane CP Ashutosh Dumbare) यांनी शहरातील तडीपार गुंडास अटक करून जेरबंद करण्याचे आदेश ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाचे हद्दीतील सर्व पोलीस(Thane Police Station) ठाण्यांना दिले आहे. कळवा पोलिसांनी (kalwa Police Station) अशाच एका तडीपार आरोपीला आहे. तडीपार आरोपी टील्या अजित मारुती सुडके (33 वर्ष) असून त्याच्याकडे एक गावठी कट्टा आणि जिवंत काडतुसे पोलिसांना आढळून आला आहे. Thane Crime News
अजित उर्फ टिल्या मारुती सुझुकी हा कळव्याच्या गोपाळ नगर परिसरात राहणार असून याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहे त्याच्या या कृतीमुळे पोलिसांनी त्याला 29 जानेवारी 2024 रोजी ठाणे मुंबई शहर मुंबई उपनगर रायगड व पालघर या जिल्ह्यातून दोन वर्षाकरिता तडीपार करण्याचे आदेश पोलीस उप आयुक्त परिमंडळ 01 ठाणे यांनी दिले होते. 07 मे 2024 रोजी तडीपारी चा कालावधी पूर्ण न करता बुधाजी नगर भेटू कडून कळवा रेल्वे स्टेशन कडे जाणारा रोडवर बेकायदेशीर रित्या आपल्याजवळ गावठी कट्टा (बंदूक) आणि 1 जिवंत काडतुसे असे विनापरवाना जवळ बाळगला असताना कळवा पोलीस ठाण्याच्या पथकाने आरोपीला अटक केली. पोलिसांनी सरकार तर्फे दिलेला फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध भारतीय हत्यार कायदा कलम 3,25 सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37 (1),135,142 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून आरोप ला अटक करण्यात आले आहे सदर घटनेबाबत पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सांगवे हे करत आहे. Thane Crime News